लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला किमान स्वबळावर बहुमत प्राप्त करण्यापासून रोखण्यात इंडिया आघाडीला यश आले. लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसने आपल्या नेतृत्वामध्ये विरोधी पक्षांची मोट बांधत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला आव्हान देण्याच्या प्रयत्नांची मालिका सुरूच ठेवली आहे. संसदेत विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता संसदेबाहेर पहिल्यांदाच इंडिया आघाडी एकत्र येऊन आंदोलन करणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अद्याप अटकेत असून, तुरुंगात त्यांची तब्येत खराब झाली आहे. लवकरात लवकर त्यांची सुटका व्हावी, याकरिता सरकारवर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.

‘आप’ने ३० जुलै रोजी जंतरमंतरवर सभा घेण्याची घोषणा केली असून, इंडिया आघाडीकडून या सभेचे आयोजन केले जाणार आहे. तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या तब्येतीला धोका असून, त्यांच्याविरोधात कट केला जात असल्याचा इंडिया आघाडीचा आरोप आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंतरमंतरवर जमलेले विरोधक या मुद्द्याबरोबरच इतरही मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप अधिक अधोरेखित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. देशातील विरोधक म्हणून इंडिया आघाडी एकत्र येऊन हे आंदोलन करीत असली तरीही पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र लढतीलच, याची काही शाश्वती देता येत नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आम आदमी पार्टी शक्तिप्रदर्शन करीत असून, त्यांना केंद्र सरकारच्या विरोधातील आपला आवाज अधिक बुलंद करायचा आहे. मात्र, आप आणि काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी एकत्र येत विधानसभेची निवडणूक लढविण्याबाबत अद्याप अनुकूलता दर्शविलेली नाही.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा

हेही वाचा : Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली?

आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे २३ मार्चपासून कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपांमध्ये ईडीच्या अटकेत आहेत. केजरीवाल यांच्या शरीरातील साखरेची पातळी ३४ वेळा ५० च्या खाली गेल्याचा दावा आप पक्षाने केला आहे. केजरीवाल यांच्यासाठी असलेले इन्सुलिनचे डोसदेखील जाणीवपूर्वक रोखले जात असून, केजरीवाल यांना जाणीवपूर्वक हानी पोहोचवण्याच्या ‘षडयंत्रा’चा हा भाग आहे, असाही आपचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यास धोका आहे, असे आपचे म्हणणे आहे. आप पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या बिघडलेल्या तब्येतीचा मुद्दा त्यांचे राज्यसभा खासदार संजय सिंग व राघव चड्ढा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत उपस्थित केला होता. या बैठकीनंतर संजय सिंह म्हणाले होते की, या मुद्द्यावर कधी आणि कुठे आंदोलन केले जाईल यावर नंतर निर्णय घेतला जाईल. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आंदोलनात कसे सहभागी व्हायचे याबाबतचा निर्णय पक्षाकडून घेण्यात घेईल. “आपकडून हे आंदोलन केले जाणार असून, आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ. मात्र, आमच्या पक्षातून कोण कोण या आंदोलनात सहभागी होईल, हे येणारा काळ ठरवेल. आपने या आंदोलनासाठी इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांना निमंत्रित केले आहे.”

दिल्ली काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या हायकमांडचा निर्णय राष्ट्रीय स्तरावरील आघाडीपुरता मर्यादित असेल. दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावरच लढविण्याच्या पक्षाच्या निर्णयावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीमधील सर्व ७० जागा एकट्याने लढविणार असल्याचे पक्षाने आधीच जाहीर केले आहे. या निर्णयावर पक्ष ठाम आहे. पुढे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले की, पक्षाने दिल्लीतील लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने तीन; तर आपने चार जागा लढविल्या होत्या. मात्र, एकाही जागेवर विजय मिळविण्यात इंडिया आघाडीला यश आलेले नाही. या आढाव्यानंतर विधानसभा निवडणुकीत एकट्याने उतरण्याच्या काँग्रेसचा निर्णय अधिक ठाम झालेला आहे; तर दुसऱ्या बाजूला आपच्या सूत्रांनी सांगितले की, अद्याप याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी वेळ आहे.

हेही वाचा : Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली?

काँग्रेसच्या आढाव्यादरम्यान, लोकसभेच्या तिन्ही उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी ‘आप’ला जबाबदार धरले आहे. जेपी अग्रवाल (चांदनी चौक), उदित राज (उत्तर पश्चिम दिल्ली) व कन्हैया कुमार (ईशान्य दिल्ली) हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सत्यशोधन समितीला सांगितले की, त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांना आपकडून पुरेसे सहकार्य मिळालेले नाही. लोकसभा निवडणुकीपासून दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने (डीपीसीसी) विविध मुद्द्यांवरून आपवर निशाणा साधला आहे. दिल्लीमधील पाण्याचे संकट आणि शहराच्या ढासळलेल्या नागरी पायाभूत सुविधांवरून काँग्रेसने आपवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही, तर दिल्ली काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी केजरीवाल हे ‘भ्रष्ट’ असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह आपच्या इतर मंत्र्यांवरही सातत्याने टीका केली आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले, “पक्षाला शहरावर आपले प्रभुत्व पुन्हा निर्माण करायचे असेल आणि दिल्लीतील पक्षसंघटनेला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.” तर दुसऱ्या बाजूला आपमधील सूत्रांनी म्हटले आहे, “निषेधाची ही हाक दिल्लीतील नेत्यांकडून नव्हे, तर पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून देण्यात आली आहे. दिल्ली निवडणुकीसंदर्भातील समस्या सोडवायला अजून वेळ आहे.”