आजपासून उत्तर प्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्ष समाजवादी पार्टीने (एसपी) कंबर कसली आहे. समाजवादी पार्टीचे आमदार हातात फलक घेऊन विधानसभेत पोहोचले. त्यांनी सभागृह परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही विधानसभेत येऊन धरणे आंदोलनात सहभागी झाले.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही निशाणा साधला. अखिलेश यादव यांनी जात निहाय जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, समाजवादी पार्टी नेहमीच जात निहाय जनगणनेच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना जात निहाय जनगणना हवी आहे, असंही अखिलेश यादव म्हणाले.

हेही वाचा- रामचरित मानसच्या वादावर अखिलेश यादव यांचं कातडी बचाव धोरण? सपा कार्यालयाच्या बाहेरून हटवले पोस्टर्स

मुख्यमंत्री योगी यांची खिल्ली उडवत अखिलेश यादव पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या राज्यातून येथे आले आहेत. त्यामुळे त्यांना येथील जात निहाय जणगणनेत काहीही रस नाही. सरकारकडून ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा दिली जाते. पण कोणता समाज किती संख्येत आहे, हेच कळत नाही. हे कळत नसेल तर आपण त्यांना त्यांचा हक्क कसा देणार? असा सवाल अखिलेश यादव यांनी विचारला.

हेही वाचा- “भारतामुळे अमेरिकेसह यूके आणि फ्रान्समध्ये रोजगार निर्माण होईल,” रविशंकर प्रसाद यांचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूक परिषदेवरूनही अखिलेश यादव यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. अखिलेश यादव म्हणाले, ज्यांना गुंतवणूक समिटमध्ये लावलेली रोपटी वाचवता येत नाहीत, ते गुंतवणूक कुठून आणणार? आता तुम्ही रस्त्यावर जाऊन बघा, सर्व रोपटी सुखली आहेत. या सरकारने शेतकरी, तरुणवर्ग आणि व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे, असंही यादव म्हणाले.