दिगंबर शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या सांगली दौऱ्यावेळी दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केवळ एकाच कार्यक्रमाला हजेरी लावत स्वत:ला दूर ठेवल्याने सांगली राष्ट्रवादीतील अजितदादा आणि जयंतरावाच्या स्वतंत्र गटांमधील अंतर्गत छुपी स्पर्धा पुन्हा चर्चेत आली आहे. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोजकेच कार्यकर्ते पवारांच्या अवतीभवती वावरत असताना पालकमंत्री पाटील यांच्या निकटचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी मात्र अंतर राखून होते तर पवारांनी सुध्दा प्रत्येक तालुक्यातील जयंत पाटील विरोधकांना जवळ घेत ताकद देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
Ajit Pawar Questionnise the voters of Baramati about the retirement of Sharad Pawar Pune print news
शरद पवारांंच्या निवृत्तीनंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार यांची बारामतीतील मतदारांना विचारणा

दक्षिण भारत जैन सभेचे शताब्दी अधिवेशन गेल्या आठवड्यात सांगलीत आयोजित करण्यात आले होते. या मुख्य कार्यक्रमासोबत कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन आणि यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण असे दिवसभराचे अनेक कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या सर्व कार्यक्रमांसाठी सांगलीत उपमुख्यमंत्री पवारांनी भरगच्च वेळ दिला होता. तत्पूर्वी आदल्या दिवशीच भाजपचे खा. संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी देखील पवार आले होते. विवाह सोहळ्यात पवार आणि माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. दोघांमध्ये स्वतंत्र संवादही घडला. त्यांनी एकत्रितपणेच वधुवरांना शुभाशीर्वाद दिले. मात्र या शाही विवाह सोहळ्यात भोजन न करता अजितदादा थेट सांगलीत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या घरी भोजनासाठी गेले. या सर्व कार्यक्रमांवेळी जयंत पाटील यांची अनुपस्थिती आणि पक्षातील त्यांच्या विरोधकांची अजितदादांबरोबर सुरू असलेली सलगी ही लक्षणीय ठरत होती.

दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीस देखील पालकमंत्री उपस्थित नव्हते, मात्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, महापौर सूर्यवंशी, प्रदेश पदाधिकारी शेखर माने, नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते. जैन सभेचे अधिवेशन दुसऱ्या टप्प्यात होते. तत्पूर्वी कर्मवीर पतसंस्थेच्या वास्तू उद्घाटनप्रसंगी निमंत्रित असूनही पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली. या कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री नरसिंहवाडीत कार्यक्रम करून निर्धारित वेळेस हजर झाले, मात्र पालकमंत्री आले नाहीत. केवळ जैन सभेच्या अधिवेशनात पालकमंत्र्यांनी अजित पवारांसोबत हजेरी लावली. या अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तासाच्या विश्रांतीनंतर मिरजेत यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम होता. यावेळी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील, जयश्री पाटील, आ. अनिल बाबर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतदेखील पालकमंत्री पाटील यांचे नाव असूनही ते उपस्थित राहिले नाहीत. पुरस्कार समितीचे अध्यक्ष विशाल पाटील तर सचिव विठ्ठल पाटील होते.

पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असेल तर पुढे पुढे करणारे पदाधिकारी सुध्दा केवळ त्यांची हजेरी असलेल्या जैन सभेच्या कार्यक्रमात उपस्थित दिसले. एरवी त्यांनी अजित पवार असूनही अंतर ठेवल्याचे सगळ्यांनाच जाणवत होते. सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंत पाटील यांची मोठी पकड आहे. ते आपल्या राजकीय डावपेचातून विरोधी पक्षातीलच नाहीतर स्वपक्षाच्या नेत्यांनाही नमोहरम करताना सांगलीने यापूर्वी पाहिलेले आहे. सांगली जिल्ह्यात भाजपाचा वाढलेल्या विस्तारामागेही त्यांनी आतून पुरवलेल्या या बळाची उघड गुपिताप्रमाणे चर्चा होत असते. दुसरीकडे जयंतरावांच्या विरोधात उभे राहू पाहणाऱ्या नेतृत्वाला अजितदादांकडून बळ दिले जात असल्याचेही दिसून येते. सांगलीच्या राजकारणातील राष्ट्रवादीअंतर्गत अजितदादा आणि जयंतरावांच्या गटात सुरू असलेला हा जुना संघर्ष आहे. अधेमधे डोके वर काढणाऱ्या या गटबाजीतील संघर्षाची नवी पावले अजितदादांच्या या दौऱ्यात पुन्हा एकदा पडलेली दिसून आली.