मधु कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नायगाव ( नंदेड) : नांदेड -देगलुर रस्त्यावर घुंगराळ नावाच गाव रस्त्याच्या दुतर्फा गर्दीने व्यापून गेल्या होत्या. रस्त्यावरच एक जुनाट छोटसं हाॅटेल. बाजूला एका झाडाच्या सावलीला वृद्वात्वाकडे झुकलेल्या दहा बारा शेतकरी, कामगारांचा जत्था उभा होता. तुम्ही का इथे उभे आहात, सहज विचारलं, तर त्यातील एक शेतकरी म्हणाला राहुल गांधीना बघायला आलो. का, दुसरा प्रश्न, त्यावर, तो राजाच हो, बघायला आलो त्याला, असं आणखी एकाने सांगितले आणि सगळ्यांनी माना डोलावून त्याच्या सुरात सूर मिसळला.

हेही वाचा >>>Gujrat Election 2022 : १० वेळा आमदार राहिलेल्या आदिवासी चेहऱ्याचा काँग्रेसला ‘रामराम’, भाजपात केला प्रवेश

भारत जोडो पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी हेच सर्वांचे आकर्षण आहे. त्यांना केवळ लांबून बघण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिला, पुरुष आपली मुले बाळे घेऊन रस्त्याच्या कडेला सकाळपासून येऊन बसतात. आजूबाजूच्या गावातून पायी, एसटीने जत्थेच्या जत्थे येऊन रस्त्याच्या कडेला कुणी खाली जमिनीवर बसून, कुणी तासनतास उभे राहून राहुल गांधी कधी येतात त्याची वाट पाहात असतात.

हेही वाचा >>>आयुष्यात कधीही चुकवलं नाही मतदान; श्याम सरन नेगी कसे बनले भारताचे पहिले मतदार?

सकाळपासूनच नांदेड – देगलुर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावांच्या वेशीला, नाक्यांवर, चौका-चौकात कुटुंबेच्या कुटुंबे, शाळकरी मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोकही यात्रेच्या स्वागतासाठी उभे होते. सूर्य जसजसा वर येईल तसा यात्रेचा आकार वाढत होता. रस्ता माणसे आणि गाड्यांनी कधी झाकून गेला ते कळत नाही .

हेही वाचा >>>हिमाचल प्रदेश : निवडणूक जिंकण्यासाठी आश्वासनांचा पाऊस; काँग्रेस, भाजपाच्या जाहीरनाम्यांत नेमकं काय?

किनाळा (ता. नायगाव) या छोट्याशा गावाच्या मुख्य रस्त्याच्या कडेला साठी गाठलेल्या कमलाबाई आपल्या सुना नातवंडांसह दीड-दोन तास उभ्या होत्या. ‘राहुल गांधी माझ्या मुलासारखा….त्यांना बघायला साडेपाच वाजल्यापासून आलोय,” असे त्या सांगत होत्या. त्यांच्या आजूबाजूला गावातील २५-३० महिला, मुलेही त्याच आकांक्षेने उभी होती. आज ते सर्वजण चार वाजताच उठून पदयात्रा पाहण्यासाठी, स्वागतासाठी आल्या होत्या. त्या रस्त्यावरून ६ वाजून २० मिनिटांनी पदयात्रा आली आणि कमलबाईंची इच्छा पूर्ण झाली. यात्रा जवळ येताच अशीच इच्छा असणारे हजारो हात अभिवादनासाठी उंचावत होते.

हेही वाचा >>>भारत जोडो यात्रा ही राजकीय हुकूमशाहीविरोधातील लढाई; जयराम रमेश यांची मोदीनीतीवर टीका

राहुल गांधी यांच्या सुरक्षा कड्याबाहेर कोणा साधूंचा एक समूह बरोबरीने चालत होता. आठ-दहा वारकरी भजन करत होते, कोणी फुले घेऊन, कोणी झेंडे उंचावत, कोणी महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा उंचावत, मुलींचे लेझीम पथक, कुठे पारंपरिक पोशाख, तर कुठे देशाची विविधतेतून एकता दर्शवणारी विविध रंगी वेशभूषा…असे अनेक रंग सोबत घेऊन पदयात्रा निघाली होती. “जातपात का बंधन तोडो…- भारत जोडो, भारत जोडो,” … अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भरून गेले होते.

हेही वाचा >>>रुचकर पदार्थांच्या भोजन व्यवस्थेमुळे भारतयात्री तृप्त

नांदगावच्या शारजाबाई हनुमंत भद्रे वयाच्या पन्नाशीत यात्रेत पुढे होत्या. त्यांच्या सोबत ४० महिला आल्या होत्या. पहाटे लवकर उठून पाच वाजता आठ किलोमीटर अंतर कापून त्या शंकरनगरला आल्या होत्या. नायगावला मुस्लिम महिला मुलांसह मोठ्या संख्येने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या होत्या. नरसी येथे लिटल स्टेप ज्ञानवर्धिनी शाळेच्या लहानग्या मुली एनसीसी गणवेशात स्वागतासाठी उभ्या होत्या, तर परभणीच्या पिंगळा येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या शाळेतील मुले वारकऱ्यांच्या वेशभूषेत उभी होती.एका स्टेजवर गांधीजी, चाचा नेहरू, इंदिराजी यांच्या वेशभूषेत मुले होती, तर पुढे कथक नृत्यांगना सलामी देत होत्या. एका ठिकाणी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात होती. भारत जोडो यात्रेतून जागोजागी विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले जात होते.