तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर द्रमुकच्या युवक संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ४५ वर्षीय उदयनिधी यांनी २०२१ साली पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविली. चेन्नई मधील द्रमुक पक्षाचा सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चेपॉक-थिरुवल्लिकेनी या विधानसभा मतदारसंघातून उदयनिधी यांनी विजय मिळवला. निवडणुकीच्या एका वर्षानंतर त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

उदयनिधी यांच्या उदयामुळे द्रमुक पक्षातील अनेकांना त्यावेळी आश्चर्य वाटले नव्हते. त्याचे कारण द्रमुकच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उदयनिधी यांनी राज्याचा दौरा करून एम्सच्या अपूर्ण कामावरून राळ उठवली होती. (अण्णाद्रमुक-भाजपा (AIADMK-BJP) सरकारच्या काळात एम्स मुदराईचे काम अर्धवट ठेवल्याबाबतचा मुद्दा त्यांनी राज्यभर पेटवला) २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने राज्यातील ३९ जागांपैकी २४ ठिकाणी विजय मिळविला. त्यांना मिळालेली मतदानाची टक्केवारी ३२.८ टक्के एवढी होती.

उदयनिधी आणि मामन्नन

सध्या, उदयनिधी हे द्रमुक पक्षाच्या सोशल मीडियावरील लक्षवेधी नेते बनले आहेत. करुणानिधी यांच्या कुटुंबातील वशंज असलेले उदयनिधी आपल्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांना अनेकदा भेट देत असतात. विशेषतः पावसाळ्यात आणि पूरपरिस्थितीची पाहणी करत असतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. जून महिन्यात उदयनिधी यांची प्रमुख भूमिका असलेला मामन्नन (Maamannan) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून त्यांनी जात वास्तव आणि द्रविड राजकारणातील त्यांचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाची निर्मिती रेड जायंट निर्मिती संस्थेने केली. ही संस्था द्रमुक कुटुंबाशी निगडित आहे. जातीच्या मुद्द्यावरून ज्यांचे चित्रपट गेल्या काही काळापासून गाजत आहेत, अशा मारी सेल्वराज या लोकप्रिय दिग्दर्शकाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. द्राविडीयन राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत जातीयवादावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला. विशेष करून पश्चिम तमिळनाडूमधील कोंगू प्रदेशातील परिस्थिती चित्रित करण्यात आली आहे.

द्रमुकचा इतिहास आणि घराणेशाही

एकाच कुटुंबाची चलती असलेला द्रमुक हा काही देशातला पहिला पक्ष नाही. मात्र मंत्रिमंडळात बाप-लेक असण्याचे प्रसंग राजकारणात दुर्मिळ आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावेळी हे चित्र दिसले होते. सामाजिक न्यायाच्या चळवळीतून जन्माला आलेल्या पक्षात एकाच कुटुंबाची पकड असल्याबाबत अनेक टीकाकारांनी स्टॅलिन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत.

द्रमुक पक्षाचे संस्थापक सी.एन. अन्नादुराई यांच्याकडून एम. करुणानिधी यांनी पक्षाचा वारसा घेतला. पक्षाची कमान हाती आल्यानंतर त्यांनी हळूहळू आपले दोन्ही मुलगे स्टॅलिन आणि एमके अलगिरी, तसेच मुलगी कनिमोळी यांना पक्षातील विविध पदे देऊ केले. मात्र आपल्या मुलांना त्यांनी सहजासहजी मंत्रिमंडळात घेतले नाही. स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात प्रवेश करण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर स्टॅलिन यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला होता.

मात्र, करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिन यांची पक्षावर मजबूत पकड आहे. त्यामुळेच उदयनिधी यांना थेट मंत्रिमंडळात सामील करून घेतल्यानंतर विरोधाचा फारसा आवाज उठला नाही. याउलट २००६-२०११ सालच्या सरकारमध्ये स्टॅलिन यांचा समावेश केल्यानंतर पक्षात त्यांच्याहून अधिक क्षमता असलेले नेते आहेत, असा दावा अनेकांनी केला होता. उदयनिधी यांनाही अशाचप्रकारचा विरोधाचा सामना करावा लागू शकतो, असे पक्षातील सूत्र सांगतात. द्रमुकच्या एका नेत्याने म्हटले होते की, २०२१ साली निवडणूकीनंतरच उदयनिधी यांना मंत्रिपद दिले जाणार होते, मात्र हाती घेतलेल्या चित्रपटांचे काम पूर्ण करायचे असल्याचे सांगून त्यांनी मंत्रिपद नाकारले होते.

उदयनिधी यांचे वैयक्तिक आयुष्य ज्यांनी जवळून पाहिले आहे, त्यांच्या मताप्रमाणे उदयनिधी यांच्यात फार काही राजकीय महत्त्वकांक्षा नाही. वडीलांपेक्षा उदयनिधी यांचे आई दुर्गा यांच्याशी जास्त जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आईच्या सांगण्यावरून उदयनिधी राजकारणा उतरल्याचे सांगितले जाते. आपल्या पतीला भावाच्या विरोधात जाऊन राजकारणात स्थिर स्थावर होण्यासाठी जो वेळ लागला, ती वेळ आपल्या मुलावर येऊ नये, यासाठी आतापासून उदयनिधी यांना राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले गेले. जेणेकरून स्टॅलिन यांच्यानंतर उदयनिधी यांनाच उत्तराधिकारी म्हणून पुढे करता येईल.

Story img Loader