सुहास सरदेशमुख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
औरंगाबाद: वार्षिक आराखड्यातील निधी वितरणावरुन उस्मानाबादचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यामधील विसंवाद वाढू लागला असून मंजूर निधीतील ९० टक्के हिस्सा पालकमंत्र्यांनी केवळ परंडा मतदारसंघात वळविल्याने निर्माण झालेला असमतोल दूर करावा, अशी विनंती करणारे पत्र तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राज्याच्या नियोजन विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे केली आहे. तर निधी वाटपात पालकमंत्री मनमानी करत असून ही एक प्रकारची हुकुमशाही असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा >>>कसब्यात भाजपच्या मदतीला शिंदेची फौज
मार्च महिन्याच्या शेवटी आणि अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वार्षिक आराखड्याच्या तरतुदीवरुन होणारे जाहीर राजकारण या वेळी शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे रंगले नाही. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रादेशिक स्तरावर घेतलेल्या आरखाड्याच्या बैठकांचा तपशील प्रकाशित करण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, आता निधीच्या कुरघोडीतून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंजूर करण्यात आलेल्या ९५ कोटी रुपयांच्या निधीपैकी ८६ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी स्वत: निवडून आलेल्या परंडा व वाशी या दोन तालुक्यांसाठीच वर्ग करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अन्य तीन मतदारसंघाच्या विकास प्रश्न प्रलंबित राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. निधीचे वार्षिक नियोजन करण्याच्या बैठकाच पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक घेत आहेत. या बैठका जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित असते. मात्र, या निधीच्या वितरणासाठी सदस्य सचिव म्हणून काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याच बाबतीत लक्ष दिले नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
हेही वाचा >>>हसन मुश्रीफ यांनी दंड थोपटले
या अनुषंगाने उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांची भेट घेतली. प्रस्तावित कामांमध्ये होणार अन्याय दूर करण्यासाठी सदस्य सचिव म्हणून लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे. दुसरीकडे निधी वितरणातील हे घोळ लक्षात घेता वरिष्ठांकडे तक्रार करण्याशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह यांनीही निधीतील असमतोल दूर करा, अशी विनंती करणारे पत्र नियोजन विभागाकडे दिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील निधी वितरणात पालकमंत्र्यांची मनमानी सुरू असल्याच्या पत्रव्यवहारामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमध्ये विसंवाद असल्याचे दिसून आले.