तमिळनाडूच्या मदुराई येथे रविवारी झालेल्या २४ व्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोमध्ये अशोक ढवळे आणि मरियम ढवळे या जोडप्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मरियम यांच्या पॉलिटब्यूरोमध्ये झालेल्या निवडीमुळे पक्षात काही बदल घडतील का, असे विचारले असता त्यांनी म्हटले, “एक महिला नेता म्हणून मी व माझ्यासारखे इतर लोक पक्षात आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये स्त्री-पुरुष असा दृष्टिकोन खूप प्रकर्षाने पाहतात.” मरियम यांचे पती व पॉलिटब्यूरो सदस्य अशोक ढवळे यांनी सांगितले, “मरियम या देशातील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला राज्य सरचिटणीस होत्या.” ढवळे हे सीपीआय (एम)च्या नवनिर्वाचित पॉलिटब्यूरोमधील जोडपे आहे. त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात, तसेच पक्षासाठी कायम एकत्रितपणे काम केले आहे. तीन वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या वयोमर्यादेमुळे पक्षाचे आणखी एक जोडपे आणि दीर्घकाळ कार्यरत असलेले नेते प्रकाश व वृंदा करात यांनी राजीनामे दिले. त्यांना आता पॉलिटब्यूरोमध्ये स्थान मिळाले आहे. दरम्यान, करात जोडपे केंद्रीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पक्षाशी जोडलेले राहणार आहेत.

मरियम आणि अशोक ढवळे याची कारकीर्द…

अशोक ढवळे (वय ७१) हे एमबीबीएस पदवीधारक आहेत. मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्राचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी १९७८ मध्ये एसएफआय (स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया)मध्ये काम सुरू केले. १९८१ ते १९८९ पर्यंत त्यांनी ‘एसएफआय’च्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस व त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९७९ मध्ये मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये शिकत असताना मरियम बुटवाला ‘एसएफआय’मध्ये सामील झाल्या. ६४ वर्षीय मरियम १९८८ ते १९९४ पर्यंत ‘एसएफआय’च्या राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून काम करीत होत्या. “आमच्या नात्यात आधी कामाची सक्रियता आणि नंतर प्रेम आले”, असे अशोक ढवळे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. “आम्हाला हे माहीत होतं की, पक्ष आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे आणि आम्ही पक्षाभोवतीच आमचं जीवन बांधले आहे”, असे मरियम यांनी सांगितले.
२०१७ मध्ये ढवळे सीपीआय (एम)च्या शेतकरी शाखेच्या अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले; तर मरियम २०१६ मध्ये अखिल भारतीय लोकशाही महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवडून आल्या.

२०२२ मध्ये पॉलिटब्यूरोमध्ये निवडून आलेले अशोक व मरियम यांनी १९९४ मध्ये पक्षाच्या कार्यालयातच लग्न केले होते. हा एक साधा समारंभ होता, असे त्या दोघांनीही म्हटले होते. “मी हिंदू आणि ती मुस्लीम म्हणून जन्मली. त्या अर्थी तो आमचा आंतरधर्मीय विवाह होता. मात्र, भगतसिंग यांचे अनुकरण करणारे आम्ही दोघेही नास्तिक आहोत”, असे अशोक यांनी सांगितले. मरियम यांनी त्या सनातनी कुटुंबातून आलेल्या नाहीत हे यावेळी स्पष्ट सांगितले; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना धर्म हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग असावा असे खूप वाटत होते; “पण आम्ही दोघांनीही या गोष्टीचे समर्थन करायचे नाही, असे ठरवले”, असे मरियम यांनी सांगितले.

पॉलिटब्यूरोमध्ये प्रत्येक जण हा स्वत:चा असतो, असेही या जोडप्याने सांगितले. “मला खात्री आहे की, आमच्यात समन्वय आहे आणि आमचे विचार स्वतंत्र आहेत. त्यात भौतिक फरक नसेल”, असे अशोक यांनी म्हटले. “पदवी शिक्षण घेत असताना दोघांनीही स्वतंत्रपणे मोर्चे काढले, तसेच ते कॉम्रेड म्हणून पॉलिटब्यूरोचा भागही होते. एखाद्याच्या आवडी समजून घेणारा जोडीदार असणं खरोखर महत्त्वाचं आहे. असे बरेच प्रसंग आलेत, जेव्हा मी बराच काळ प्रवास करीत असते आणि त्यानंतर अशोक मोठ्या प्रवासाला जातात. पण, घरी साधी खिचडी करायची असेल तरी ती नि:संकोचपणे आम्ही दोघेही बनवतो”, असे मरियम यांनी सांगितले. आयुष्याचा जोडीदार निवडताना कायम सुसंगता पाहावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी इतर महिलांना दिला.