Delhi Assembly Election Result : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (८ फेब्रुवारी) निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाचा दिल्लीत पराभव होईल असे भाकित वर्तवण्यात आले आहे. जर निकालानंतर आम आदमी पक्षाचा परभव झाल्यास १२ वर्षांपूर्वी पक्षाच्या स्थापनेपासूनचा हा त्यांचा दिल्लीतील सर्वात वाईट काळ असेल. दरम्यान पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेसशी वाटाघाटीचे दरवाजे खुले आहेत आणि गरज पडल्यास ते काँग्रेसची मदत घेतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची परिस्थिती शनिवारी दुपारीच स्पष्ट होईल, परंतु काही नेते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसने आमच्याविरुद्ध जोरदार प्रचार मोहीम राबवली होती, त्यामुळे त्यांना काही जागा मिळाल्या तर त्याचा फटका आम्हालाच बसलेला असेल. असे असले तरी, आम्ही सर्वजण इंडिया आघाडीचा भाग आहोत आणि गरज पडल्यास आणि काँग्रेसने जागा जिंकण्यात यश मिळवले तर बाहेरून पाठिंबा असलेले सरकार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे पक्षाच्या एका अंतर्गत सूत्राने सांगितले. असे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना विजयाचा आत्मविश्वास

आप नेत्यांनी असा दावा केला की, यापूर्वीही एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत आणि पक्ष दिल्लीत सलग तिसऱ्यांदा निश्चित बहुमत मिळवेल.

उमेदवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर, आम आदमी पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष गोपाल राय यांनी, सांगितले की, त्यांचा पक्ष ५० पेक्षा जास्त जागा सहज जिंकेल आणि इतर चुरशीच्या लढती होतील. “सर्व उमेदवारांनी त्यांचे ग्राउंड रिपोर्ट सादर केले आहेत, यातून असे दिसते की, आप ५० पेक्षा जास्त जागा सहजपणे जिंकेल, तर सात-आठ जागांवर चुरशीची लढत होईल,” असे गोपाल राय यांनी पत्रकारांना सांगितले.

आम आदमी पक्षाच्या एका सूत्राने पुढे म्हटले की, “अशा ४५ जागा आहेत जिथे निकाल अगदी स्पष्ट आहेत. या जागांवर एकतर आप जिंकेल किंवा भाजपा. उर्वरित २५ जागांवर, चुरशीची लढत आहे. यापैकी १० जागा अत्यंत चुरशीच्या आहेत आणि त्या कोणताही पक्ष जिंकू शकतो. यापैकी दोन ते तीन जागांवर काँग्रेसला संधी आहे.”

२०१३ आप सरकारला होता काँग्रेसचा पाठिंबा

जर काँग्रेसने ‘आप’ला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला तर यामध्ये काही नवीन नसेल. कारण २०१३ मध्ये, आपला त्यांच्या पहिल्या निवडणुकीत, २८ जागा जिंकता आल्या होत्या. ते ३६ च्या बहुमताचा आकड्यापासून ८ जागा दूर होते. तर भाजपाने ३१ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी आठ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत लोकपाल विधेयक मांडता न आल्याचे कारण देत ४९ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

स्थानिक नेते-कार्यकर्त्यांमुळे आप-काँग्रेची युती नाही

दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवली होती. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते स्वबळवर लढले आहेत.