प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : नांदेड-लातूरमधील नात्याची राजकीय वीण विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री होण्यापासून विळ्या- भोपळ्याच्या उपमांनी वर्णिलेली. ‘भारत जोडो’मध्ये हे नातेही जोडले जाईल या भ्रामक कल्पनेत काही आशावादी कार्यकर्ते होते. पण अगदी पोस्टर छपाईपासून ते भारत जोडो यात्रेत काेणत्या जिल्ह्यात सहभागी व्हायचे यावरून विळा- भोपळ्याचे वर्णन अशोकराव आणि अमित देशमुख यांनी जपले असल्याची चर्चा यात्रा महाराष्ट्रातून परतल्यानंतर जोर धरू लागली आहे.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातून सुरुवात झाली व ती हिंगोली, वाशिम मार्गे विदर्भात गेली. नांदेडच्या यात्रेची स्वाभाविकपणे जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होती तर हिंगोलीत सातवांच्या निधनानंतर पक्ष संघटना तितकीशी मजबूत नसल्यामुळे लातूरचे अमित देशमुख यांच्यावर हिंगोलीची जबाबदारी देण्यात आली.नांदेड येथे महाराष्ट्रातील राहुल गांधी यांची पहिली सभा झाली. या सभेला राज्यातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. वृत्तपत्राच्या जाहिरातीत त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. मात्र या कार्यक्रमासाठी काँग्रेसमधील एक वजनदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र व माजी मंत्री अमित देशमुख यांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळेच अमित देशमुख यांची इच्छा असूनही राहुल गांधीच्या पहिल्या सभेला त्यांना उपस्थित राहता आले नाही.

हेही वाचा: प्रवीण दटके : निष्ठावंत कार्यकर्ता

हिंगोलीच्या चार दिवसाच्या यात्रेची जबाबदारी पक्षाने अमित देशमुख यांच्यावर दिली होती. या यात्रेचे नियोजन करण्यात ते व्यस्त होते. नांदेडच्या यात्रेची चर्चा महाराष्ट्रभर झाली त्याच धर्तीवर हिंगोलीचे नियोजन व्हावे असा प्रयत्न अमित देशमुख व त्यांच्या सहकार्याचा होता. मात्र नांदेडचा ठसा वेगळा दिसायला हवा यासाठी ते वेगळेपण जपावे या हेतूने हिंगोलीच्या नियोजनात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. अगदी नांदेडप्रमाणे बॅनर, होर्डिंग, यांचे डिझाईन हिंगोलीमध्ये कसे होणार नाही याकडे अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी लक्ष दिल्याचे दिसून आले. तुमचे डिझाईन मिळेल काय, या लातूरकरांकडून केलेली विनंती नांदेडकरांनी धुडकावून लावली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflict ashok chavan vs amit deshmukh hingoli nanded latur bharat jodo yatra print politics news tmb 01
Show comments