सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले असताना पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपमध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि अकलूज बलाढ्य मोहिते-पाटील कुटुंबीयांत उघड संघर्ष सुरू झाला आहे. भाजपचे जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आगामी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर करून तसा स्पष्ट निर्धार बोलून दाखविला आहे. त्यामुळे खासदार निंबाळकर यांची अडचण वाढल्याचे दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे लोकसभेची एकेक जागा महत्वाची असल्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींना वलयांकित प्रतिमा असलेल्या मोहिते-पाटील यांना दुखावून चालणार नाही, असे राजकीय जाणकार सांगतात. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ताब्यातून माढ्याची जागा भाजपला जिंकून देण्यात मोहिते-पाटील कुटुंबीयांची भूमिका निर्णायक होती. किंबहुना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडण्यासाठी मोहिते-पाटील हे किंगमेकर ठरले होते, हे मतांच्या आकडेवरून दिसून येते. परंतु निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते-पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्यामुळे विशेषतः मोहिते-पाटील विरोधकांशी दोस्ताना वाढविल्यामुळे त्यांच्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला होता. दोघेही सावध होते. आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्यात उघडपणे संघर्ष वाढला असून दोघेही रणांगणावर उतरले आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.
हेही वाचा… ‘इंडिया’ आघाडीत प्रागतिक आघाडीचा तीन जागांवर दावा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आदी दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोहिते-कुटुंबीय राष्ट्रवादीतून थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तेथील राजकीय समीकरणेच बदलली होती. भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने मोहिते-पाटीलविरोधक माढ्याचे संजय विठ्ठलराव शिंदे यांना रणांगणात उतरविले. मोहिते-पाटील कुटुंबीयांसह भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूजमध्ये ऐतिहासिक प्रचार सभा झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार यांनीही जोर लावला होता. मोहिते-पाटील यांनी भाजपला एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द खरा ठरला आणि निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाख ६३० मतांची मिळालेली मोठी आघाडी विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली. याउलट प्रतिस्पर्धी संजय शिंदे यांना त्यांच्या स्वगृहातून म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघातून ६५०५ तर करमाळा विधानसभा मतदारसंघातून ३० हजार ४२९ आणि सांगोल्यातून ३३७४ मतांची आघाडी मिळाली होती. निंबाळकर यांना त्यांच्या हक्काच्या फलटण-कोरेगावमधून अवघ्या १३९१ मतांची आघाडी मिळाली होती. यात निंबाळकरांच्या फलटणमधून तर जेमतेम ७०२ मतांची आघाडी होती. माण-खटावमधून २३ हजार २१५ मताधिक्य मिळाले होते. म्हणजेच फलटण व माण-खटावमधून म्हणजेच सातारा जिल्ह्यातून २४ हजार ६०६ मतांची आघाडी घेणे शक्य झाले होते. इकडे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार करता करमाळ्यात १० हजार १८७, माढ्यात ३७ हजार ५६७, पंढरपुरात ६५८६, सांगोल्यात ३०८५ याप्रमाणे संजय शिंदे हे मताधिक्य मिळवून होते. एकट्या मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यातून निंबाळकर यांना तब्बल एक लाख १७ हजार ७४७ मतांची घसघशीत आघाडी मिळाली होती. याच जोरावर रणजितसिंह निंबाळकर यांना एकूण पाच लाख ८३ हजार १९१ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी संजय शिंदे यांच्या पारड्यात चार लाख ९८ हजार २६३ मते पडली होती. म्हणजेच निंबाळकर यांना ८४ हजार ९२८ मताधिक्य घेऊन खासदार होता आले होते. ही मतांची आकडेवारी पाहता विजयाचे शिल्पकार मोहिते-पाटील हेच ठरले होते.
हेही वाचा… तापलेल्या ऊस आंदोलनातून मार्ग काढताना शिंदे सरकारची कसोटी
या पार्श्वभूमीवर निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात सुरू झालेला संघर्ष माढा लोकसभा निवडणुकीत वादळ निर्माण ठरेल, असे बोलले जाते. मोहिते-पाटील यांचे प्रमुख विरोधक असलेले माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे अजितनिष्ठ पर्यायाने सत्ताधारी महायुतीत असूनही मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी जवळीक वाढविली आहे . तर इकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून, भाजपच्या तिकिटावर आगामी माढा लोकसभा निवडणूक आपणच लढविणार आहोत. कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. गेल्या साडेतीन वर्षात आपला संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढला आहे. लोकसभेसाठी आपली संपूर्ण तयारी झाल्याचा दावा धैर्यशील मोहिते-पाटील करतात. खासदार निंबाळकर यांनीही दुस-यांना खासदारकीची संधी आपणांसच मिळणार असल्याचा प्रतिदावा करीत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांचा अनुभव पाहता निंबाळकर यांच्या विरोधात सार्वत्रिक नकारात्मक परिस्थिती दिसत असून खासदार म्हणून निंबाळकर हे स्वतःच्या कोषाबाहेर येत नाहीत. फलटण-पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग उभारणी असो वा इतर महत्वाच्या विकास कामांसाठी निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात श्रेयवादाचे राजकारण वाढले आहे. पक्षश्रेष्ठी त्यात हस्तक्षेप करीत नाहीत. त्याचा फटका शेवटी भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र दिवाळीतच माढा लोकसभा निवडणुकीचे फटाके फोडले जात असल्यामुळे त्याबद्दल उत्कंठा वाढली आहे.