अमरावती : जिल्‍ह्यातील आठ जागांपैकी सात जागा जिंकून महायुतीने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले असताना भाजपने पाच जागी विजय मिळवत गेल्‍या निवडणुकीतील पराभव धुवून टाकला. पण, या निवडणुकीत महायुतीतील विसंवाद देखील प्रकर्षाने समोर आला. माजी खासदार नवनीत राणा यांचा गट जिल्‍ह्यातील भाजपवर पकड मजबूत करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असताना भाजपमधील एक गट मात्र अस्‍वस्‍थ झाल्‍याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांच्‍या गटाने जिल्‍ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले. बडनेरातून युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र दर्यापूरमधून त्‍यांच्‍या पक्षाने महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात उमेदवार उभा केला. भाजपचा एक गट अभिजीत अडसूळ यांच्‍या प्रचारात व्‍यस्‍त असताना नवनीत राणा या उघडपणे अडसूळ यांच्‍या विरोधात प्रचार करताना दिसल्‍या. त्‍यामुळे दर्यापूर मतदारसंघात भाजपमध्‍ये गोंधळाची स्थिती होती. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य अरविंद नळकांडे यांनी तर नवनीत राणा आणि जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. अनिल बोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम

आणखी वाचा-विदर्भातून निवडून आलेल्यांपैकी ३७ आमदार ओबीसी, विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र

अमरावतीत महायुतीच्‍या उमेदवार सुलभा खोडके यांना पाठिंबा देण्‍याऐवजी राणा दाम्‍पत्‍याने उघडपणे भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांना बळ दिले. दुसरीकडे, भाजपचे शहराध्‍यक्ष आणि आमदार प्रवीण पोटे, प्रदेश सचिव जयंत डेहणकर, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर, चेतन पवार, हे स्‍थानिक नेते सुलभा खोडके यांच्‍या प्रचारात व्‍यस्‍त होते. या ठिकाणीही भाजपमध्‍ये विसंवाद दिसून आला. भाजपच्‍या पाचही नवनियुक्‍त आमदारांचे अभिनंदन शहरातील भाजपच्‍या कार्यालयात करण्‍यात आले, त्‍यावेळी आमदार प्रवीण पोटे आणि त्‍यांच्‍या समर्थकांच्‍या अनुपस्थितीने भाजपमधील अंतर्गत मतभेदाची चर्चा सुरू झाली.

आणखी वाचा-भंडारा जिल्ह्यात भाजपची अधोगती; तीन विधानसभा मतदारसंघ, पण एकही आमदार नाही

लोकसभा निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्‍वीकारून भाजपचे शहराध्‍यक्ष प्रवीण पोटे यांनी पदाचा राजीनामा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडे पाठवला होता. यावर कोणताही निर्णय घेण्‍यात आला नाही. त्‍यानंतर विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी प्रवीण पोटे यांनी अमरावतीच्‍या महायुतीच्‍या उमेदवार सुलभा खोडके यांच्‍या प्रचारात स्‍वत:ला गुंतवून घेतले. खोडके यांचा विजय झाला. त्‍यामुळे प्रवीण पोटे यांचा गट सुखावला असला, तरी त्‍यातून राणा गट आणि पोटे गट यांच्‍यातील अंतर पुन्‍हा एकदा वाढल्‍याचे सांगितले जात आहे. भाजपमध्‍ये राणा दाम्‍पत्‍याच्‍या वाढत्‍या हस्‍तक्षेपामुळे आता महापालिका निवडणुकीच्‍या वेळी काय होणार, याची चिंता अनेकांना भेडसावू लागली आहे. रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षासोबत भाजपला जुळवून घ्‍यावे लागणार असल्‍याने जुने कार्यकर्ते आता काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.