दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर कागद आणि पेन घेऊन थांबलेल्या आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांसमोर एकच प्रश्न – पक्षातील किती आमदारांशी संपर्क झाला? भाजपाला हरविण्यासाठी आपल्या दिल्लीतील आमदारांना प्रत्येकी 20 कोटींची ऑफर भगव्या गोटातून मिळाल्याचा आरोप आपने केला. मात्र भाजपाने हा आरोप फेटाळून लावत आपकडे पुराव्याची मागणी केली. त्यानंतर लागलीच राजकीय कामकाज शिखर समितीमधील नऊ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास केजरीवाल यांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. हे सगळे शक्तिप्रदर्शन दाखविण्याकरिता करण्यात आले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही बैठक सुरू होण्यापूर्वी पक्षातील ६-७ आमदार नॉट रिचेबल झाल्याने एकच गहजब झाला. बैठकीची वेळ जवळ येताच कालवाकालव वाढली. मात्र दुपारी सर्व आमदार केजरीवाल यांच्या घरी हजर झाल्याची बातमी आली. आप’चे सरकार स्थिर असल्याने सर्वांनी हुश्श केले. काही आमदार शहराबाहेर गेल्याने त्यांचा संपर्क तुटल्याचे मागाहून स्पष्ट झाले.

यावेळी ओखला येथील पक्षाच्या आमदार सौरभ भारद्वाज यांनी आपण ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगितले. मात्र केजरीवाल यांच्याशी व्हीडिओ कॉलवर बोलणे झाल्याची माहिती त्यांनी दिली. या सगळ्या प्रकाराला भाजपाने आप’चा ‘फ्लॉप शो’ म्हणले असून आप’ला कोणतेही प्रत्युत्तर देणार नसल्याचे म्हटले आहे. केजरीवाल सरकार आणि उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरणावरून लावण्यात आलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भाजपाने सांगितले.केजरीवाल यांच्या घरी झालेल्या या बैठकीनंतर त्यांनी ५० आमदारांसह राजघाटाकडे कूच करून महात्मा गांधी यांच्या स्मारकासमोर प्रार्थना केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conflicts between aap and bjp is on high tip in delhi pkd
Show comments