मोहनीराज लहाडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नगर : महाविकास आघाडीपेक्षा नगर जिल्ह्यात महायुतीमधील बेबनाव अधिक निर्माण झाल्याचे चित्र समोर येत. जिल्ह्यात भाजप अंतर्गत खदखद असतानाच भाजप आणि विविध घटक पक्षांत बेबनाव बघायला मिळतो. निवडणुकांचा कालावधीत जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा तो अधिक वाढत चालला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक आमदारांचे संख्याबळ एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. फुटीनंतर आता तसे ते राहिले नाही. सत्तेत सहभागी झालेल्या अजितदादा गटाचे पारडे जड झाले आहे. नगर शहरात शरद पवार गटाला आणि उर्वरित ग्रामीण भागात अजितदादा गटाला एकत्र ठेवेल, असा समान धागा अद्याप सापडलेला नाही. जिल्ह्यात काँग्रेसकडे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या रूपाने एकमुखी नेतृत्व असले तरी संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला कमकुवतपणा आलेला आहे. आमदार थोरात यांचे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर भक्कम स्थान असले तरी जिल्ह्यात पक्ष संघटनेला दुय्यम स्थान आहे. शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गट यांची परिस्थिती काँग्रेसहून अधिक बिकट आहे. सत्तारूढ भाजप अंतर्गत कलहाने, नव्या-जुन्यांतील अवमेळाने व्यापलेला आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी थोरल्या पवारांकडून धाकल्या पवारांच्या गटात
राज्यात भाजप-शिंदे गट-अजितदादा गट एकत्रित सत्तेत असले तरी जिल्ह्यात त्यांची परस्परविरोधी तोंडे आहेत. संधी मिळेल तशी ही तोंडे एकमेकांवर गुरगुरत असतात. सत्तेत एकत्र आले तरीही भाजपचे खासदार सुजय विखे व पारनेरचे अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांच्यातील वितुष्ट कमी होण्यास तयार नाही. खरेतर आमदार लंके अजितदादा गटात सहभागी झाल्याने खासदार विखे यांच्यावरील लोकसभा निवडणुकीचा तणाव बराचसा दूर झाला. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांतील मतभेद त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. अजितदादा गटाचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे आणि भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील वैमनस्य पिढीजात आहे. दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आले म्हणून त्यांच्यातील वैमनस्य कमी होईल, अशी परिस्थिती नाही. गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते थोरात व कोल्हे गटात सलोखा वाढला आहे, तर दुसरीकडे विखे-कोल्हे गटातील वादाने परिसिमाही गाठली आहे. तीच परिस्थिती अकोल्यात अजितदादा गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भाजप नेते मधुकर पिचड यांच्यामधील आहे. परस्परांचा विरोध हीच या सर्वांच्या राजकारणाच्या लढाईचे हत्यार बनले आहे.
हेही वाचा… निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेसची खास रणनीती; प्रचारासाठी हरियाणातील नेत्यांकडून मदत
भाजप खासदार विखे पर्यायने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे सर्वाधिक सूर जुळले गेले आहेत ते नगर शहरात अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी. त्याहून अधिक सख्य निर्माण झाले आहे ते आमदार जगताप यांचे श्वसूर भाजप नेते जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्याशी. अलीकडच्या काळात खासदार विखे-आमदार जगताप-माजी आमदार कर्डिले बहुसंख्य कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावतात. मात्र या त्रिकुटाच्या सख्यातून सर्वाधिक गोची झाली आहे ती नगर शहर भाजपची. शहरातील भाजप आणि जगताप-कर्डिले यांच्यातून विस्तवही जात नाही. शहरात तसे ध्रुवीकरणच घडले आहे. मात्र विखे पितापुत्र ही राजकीय कसरत साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांनी अनेकवार आमदार जगताप यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रणही दिले. त्यामुळे शहर भाजपला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे.
हेही वाचा… नांदेडमध्ये नातेसंबंधांची एक वीण घट्ट तर दुसरी उसवली!
शिंदे गट जिल्ह्याच्या उत्तर भागात, शिर्डी मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या रूपाने काहीसे अस्तित्व राखून असला तरी राज्य पातळीवरचे नेते एकत्र जिल्ह्यात आलेतरच विखे-लोखंडे एकत्रित दिसतात. लोखंडे उत्तर भागात विखे यांच्या प्रभावामुळे संघटनात्मक फळी अद्याप निर्माण करू शकलेले नाहीत. जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिंदे गटाचे अस्तित्व नगर शहर वगळता नगण्य आहे. शहरातील अस्तित्वही फारसे बाळसे धरू शकलेले नाही.
नव्या-जुन्यांचा ताळमेळ घालता न आल्याने भाजपला संघटनात्मक नेमणूका अद्याप करता आलेल्या नाहीत. दक्षिण भागात नियुक्त्या झाल्या, मात्र त्यातून वादच अधिक उफाळले. आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक पवित्रा घेताच संघटनेवरील त्यांच्या विरोधकांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. यामागे विखे-कर्डिले यांचेच प्रयत्न असल्याचा दावा राजळे समर्थक करतात. हे सर्व चित्र महायुतीमधील बेबनाव स्पष्ट करणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही पवारांच्या गटांची संघटनात्मक बांधणी चाचपडत सुरु असली तरी महाविकास आघाडीतील घटक पक्ष जिल्ह्यात एकत्र आणण्याचे प्रयत्न महायुतीपेक्षा अधिक संघटितपणे होताना दिसत आहेत.