चंद्रशेखर बोबडे

नागपूर : पक्षीय कामकाजापेक्षा रोज माध्यमासमोर येऊन बोलण्यातच धन्यता मानणारे, अति बोलण्याच्या नादात कधी-कधी पक्षनेतृत्व अडचणीत येईल, अशी विधाने करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने चर्चेत आले आहेत. २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असताना बावनकुळे यांनी मात्र ‘नेतृत्व कुणी करायचं, याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. याचा निर्णय केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांकडून घेतला जातो’ असे विधान केले आहे. दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांमुळे भाजपच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार की राहणार? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि २०२४ च्या निवडणुकीचे नेतृत्व तेच करतील, असे स्पष्ट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी नागपुरात फडणवीस यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फलक लागला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही निवडणुकीतील नेतृत्वाच्या मुद्यावर भाष्य करताना फडणवीस यांच्या विधानाला छेद देणारी भूमिका मांडली. “नेतृत्व कोण करेल याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. यावर केंद्रीय संसदीय बोर्डाकडून निर्णय घेतला जातो. कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला उमेदवारी द्यायची? कुणाला मंत्री बनवायचं? कुणाला मुख्यमंत्री बनवायचं? हे सर्व निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाकडून घेतले जातात, असे ते म्हणाले.

हेही वाचा… ठाकरे – शिंदे वादाचा वैद्यकीय महाविद्यालयाला फटका? महाराष्ट्र दिनापासून परभणीकर पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

वरील दोन्ही बाबींचे तत्काळ पडसाद उमटल्याचे पहावयास मिळाले. फडणवीस यांनी तत्काळ संबंधिताना ‘तो’ फलक काढण्यास सांगितले. बावनकुळे यांनीही आपले विधान हे २०२४ नंतरच्या घडामोडीबाबतचे होते. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असे जाहीर केल्याने ते सर्वांनाच मान्य आहे. माझे भाष्य भाजपमधील निर्णय प्रक्रियेबाबत होते, असे स्पष्ट केले. मात्र याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यांचे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यावर नाराजीची प्रतिक्रिया दिली. यापूर्वीही भाजप नेत्यांच्या परस्पर विरोधी विधानांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होण्याची तसेच त्यामुळे भाजप-शिंदे गटात दुरावा निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत.

हेही वाचा… कल्याणमधे ठाकरे गटाला मनसैनिकांचे बळ

राज्यात सत्तापालट झाल्यावर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची सल महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मनात आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे हे सुद्धा अनेकांना खटकले. पण स्वत: फडणवीस यांनी मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत काम सुरू केले. एकीकडे फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेत असतानाच दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांच्या विधानामुळे युतीत दुरावा निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे खुद्द फडणवीस यांचीच अडचण होत असल्याचेही अनेक वेळा दिसून आले आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अलीकडच्या काळातील विधाने युतीचे शिल्पकार म्हणून फडणवीस यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे. फडणवीस यांनी अनेकदा शिंदे हेच मुख्यंमंत्री राहतील हे वारंवार स्पष्ट केले असतानाही डिसेंबर २०२२ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच बावनकुळे यांनी जाहीरपणे फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केल्याने फडणवीस यांची अडचण झाली होती. शिंदेच अडीच वर्षे मुख्यमंत्री राहतील, हे फडणवीस यांना सांगावे लागले होते. युतीच्या जागा वाटपावरही बावनकुळे यांनी मुंबईत पक्षाच्याच एका कार्यक्रमात भाष्य केल्याने भाजपची अडचण झाली होती. नंतर बावनकुळे यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले होते हे येथे उल्लेेखनीय.

हेही वाचा… राणा दाम्‍पत्‍याची राजकीय वाटचाल काटेरी वळणावर?

“२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या व मोदींच्या नेतृत्वातच आम्ही पुढची निवडणूक लढणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनीही तेच सांगितले असून ते सर्वांना मान्य आहे. माझे सांसदीय मंडळाबाबतचे भाष्य २०२४ च्या निवडणुकीनंतरच्या निर्णयप्रक्रियेशी संबंधित होते. भाजपमध्ये सांसदीय मंडळाचा निर्णय सर्वोच्च असतो व तो सर्वांना मान्य करावा लागतो.” – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप