दिगंबर शिंदे

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना आता अयोध्या प्रेमाचे आलेले भरते पाहून जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. खुद्द आमदार पाटील यांनी याचा इन्कार केला असला तरी सातत्याने आमदार पाटील यांच्याबाबतच का चर्चा होते हे न उलगडणारे कोडे ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीतील मोठा गट घेऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा अचानक निर्णय घेतला. यामुळे आमदार पाटील यांना शरद पवार गटात राज्यात पक्षामध्ये एक नंबरचे स्थान मिळाले असले तरी त्यात ते समाधानी आहेत असे सध्या तरी दिसत नाही.

jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rebellion of jayashree patil three way contest in the sangli assembly constituency
सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi for spreading chaos in India print politics news
‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका
Loksatta chavadi political drama in maharashtra
चावडी: बंटी पाटील एवढे का संतापले?
Assembly election 2024  Pen Assembly Constituency Mahavikas Aghadi Election
लक्षवेधी लढत:पेण: शेकापसाठी अस्तित्वाची लढाई

राज्यात महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली त्यावेळीही अजितदादांनी पहाटेचा शपथविधी करून राष्ट्रवादीला रामराम केला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीवर झालेला राजकीय हा परतवून लावत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीकडून आपलेच नाव पुढे केले जाईल असे वाटत असताना पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये अजिदादा उपमुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची संधी आपणास मिळावी अशी अपेक्षा असताना तेथेही अजितदादांनीच बाजी मारली. यामुळे आमदार पाटील कितीही सांगत असले तरी त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती.

हेही वाचा… मावळमध्ये संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित करून ठाकरे गटाची प्रचारात आघाडी

मात्र त्यांना महाविकास आघाडीचे सरकार असतानाही भाजपकडून १५ आमदारांचा गट बाहेर पडून भाजपमध्ये सहभागी होण्याची ऑफर होती. मात्र, त्यांनी धाडस केले नाही, की त्यांना १५ आमदारांचा गट बाहेर काढणे शक्य झाले नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय बंद मुठीतच राहिला असल्याची भाजप गोटातून चर्चा आहे.उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्यावेळी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रीपद आणि जलसंपदा खातेही राखीव ठेवण्यात आल्याची आजही चर्चा आहे. हीच चर्चा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी बोलून दाखवत आमदार पाटील मनाने सत्तेसोबत असल्याचे सांगत गुगली टाकली. यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबलेला आहे अशी पूरक माहितीही त्यांनी दिली. आमदार पाटील यांनी तातडीने याचा इन्कार केला. आपण शिरसाट यांना कधी भेटलोच नाही असे सांगत या वक्तव्याला अदखलपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्‍वभूमीवर इस्लामपूरमध्ये आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता कलशाचे स्वागत करण्यासाठी आमदार पाटील हे कारखाना कार्यस्थळावरील राममंदिरात उपस्थित राहिले. धार्मिक विधीमध्ये सहभागी होत आपले वडिल राजारामबापू यांच्या नावातच राम असल्याने आपण रामभयत असल्याचे सांगण्याचा आणि दर्शविण्याचा प्रयत्न केला. आपल्यालाही अयोध्येला जायचे आहे, मात्र,गर्दी कमी झाल्यावर आपण तेथे जाणार आहे असे सांगत असताना राम हा कोणत्याही एका पक्षाचा नाही, सामान्य जनतेचा आदर्श पुरूष असल्याचे सांगत आपले पुरोगामीत्व दर्शविण्याचाही प्रयत्न केला आहे.

हेही वाचा… कोल्हापुरात हसन मुश्रीफ – सतेज पाटील या आजी माजी पालकमंत्र्यात निधी वाटपावरून संघर्ष

सध्या इस्लामपूरधील आमदार पाटील यांचे निकटवर्तिय समजले जाणारे दोन महत्वाचे मोहरे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या गळाला लागले असल्याची चर्चा इस्लामपूरच्या चौका-चौकात आहे. गेली ४० वर्षे सोबत असलेले मोहरे जर दादासोबत जाणार असतील तर त्यांना यापासून रोखण्याचा डावही त्यांचा असू शकतो, अथवा सत्तेसोबत जायचे की विरोधात राहायचे याची अनिर्णित अवस्था असू शकते.

याच दरम्यान, सांगलीत बैठक घेउन दादा गटात जाण्याची मानसिकतेत असलेल्या माजी नगरसेवकांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. हातकणंगले लोकसभेसाठी पुत्र प्रतिक पाटील आणि सांगली लोकसभेसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नावाची शिफारस याच बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा प्रबळ दावा असताना, विशाल पाटील तयारी करीत असतानाही या गटाची नवीन भूमिका अचंबित करणारी तर आहेच, पण काँग्रेसच्या विशाल पाटील यांना शह देण्याचा प्रयत्नही असू शकतो. याच बरोबर माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेटही घेतली. या पार्श्‍वभूमीवर आमदार पाटील यांनी विजय बंगल्यावर चहापाणी घेतल्याने नव्या चर्चेला घुमारे फुटत आहेत. यामागे महापालिकेची मोर्चेबांधणी आहे की, लोकसभेसाठी दबाव तंत्र आहे हे लवकरच स्पष्ट होईल.