तुकाराम झाडे

हिंगोली : भाजपकडून हिंगोली लोकसभा मतदार संघात सुरू असलेली जोरदार तयारी लक्षात घेता, शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी आणि राजकीय भवितव्याबाबत आत्तापासूनच तर्कवितर्क लावले जात आहे. एकूणच खासदार हेमंत पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याची खेळी करण्यात भाजपने आघाडीच घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
Kamathi Vidhan Sabha Constituency President Chandrasekhar Bawankule Nominated
लक्षवेधी लढत: कामठी : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत

भाजपची मंडळी वारंवार हिंगोली लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत. त्या दृष्टीने शंतनू ठाकूर व डॉ. भागवत कराड दोन केंद्रीय राज्यमंत्र्यांसह भाजपचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संघटनमंत्री संजय कौडगे यांनीही येथे दौरे काढून बैठका घेतल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील ओबीसी नेते खासदार संगमलाल गुप्ता यांनी तर जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाची बैठक घेतली. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीत महिला मेळावा झाला.

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात संयुक्तपणे लढण्यावर महाविकास आघाडीत ऐक्य

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीतील दुसरा टप्पा म्हणून केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव व पक्षाचे केंद्रीय संघटनमंत्री शिवलालजी लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनानुसार कळमनुरीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली आहे. हिंगोली लोकसभेची जागा भाजपनेच जिंकली पाहिजे, असा संदेश पद्धतशीरपणे पोहचवला जात आहे.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये घोळ काॅंग्रेसच्या अंगाशी

भाजपची लोकसभेची तयारी लक्षात घेता पक्षाचे स्थानिक नेत्यांमध्येही उत्साह दिसत असून भाजपचे हिंगोलीचे विद्यमान आमदार तान्हाजीराव मुटकुळे, कळमनुरीचे माजी आमदार गजाननराव घुगे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, अॅड. के. के. शिंदे, माहूरगड येथील श्याम महाराज योगी, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, अॅड. शिवाजी जाधव, रामदास पाटील आदी मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात चाचपणी करत फिरताना दिसत आहेत.

हेही वाचा >>> शरद यादवांनी लालू प्रसाद यादवांना हरवत नितीश कुमारांशी दोस्ती निभावली पण… वाचा काय घडलं?

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) खासदार हेमंत पाटील यांचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपची ज्या पद्धतीने तयारी सुरू आहे, त्यावरून तर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर संभ्रमाचे ढग जमा होऊ लागले आहेत. खासदार यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करण्याची खेळी भाजपचीच एक रणनीती आहे का, असाही एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपचीच काही मंडळी खासदार पाटील यांच्या कामावर व कामाच्या पद्धतीवर बोट ठेवून माध्यमांतून चर्चा घडवून आणत आहे. हेमंत पाटील हे स्वत:ला नांदेडचेच

खासदार समजतात, अशी कायम चर्चा असते. . त्याचा राजकीय फायदा उठवत खासदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला तडा देण्याची भाजपची रणनीती यशस्वी झालीच तर लोकसभेचा उमेदवार बदलण्याची मागणी पुढे येऊ शकते.  खासदार हेमंत पाटील यांचा खडतर बनलेला राजकीय मार्ग आणखीच बिकट होणार आहे. लोकसभा मतदार संघातील तसे चित्र आहे. हिंगोली लोकसभेच्या इतिहासात दिवंगत खासदार उत्तमराव राठोड वगळता इतर दुसऱ्या कुणाला सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याची संधी अद्याप तरी मिळाली नाही. ही मतदार संघाच्या इतिहासाची परंपरा कायम राहणार की खंडित होणार, अशी चर्चा सुरू आहे.