Congress Allegations on RSS-CPM Nexus: गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये काँग्रेसकडून सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात माकपवर आरोप केले जात आहेत. यंदा केरळमध्ये निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं खातं उघडलं असून थ्रिसूरमध्ये सुरेश गोपी यांचा विजय झाला आहे. मात्र, या विजयामागे स्थानिक पूरम उत्सवात झालेला गोंधळ आणि त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे व कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. आर. अजित कुमार यांची झालेली भेट कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून केरळमधील वातावरण तापलं आहे.

काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा माकप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कथित हातमिळवणीची चर्चा केरळमध्ये रंगू लागली आहे. केरळमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस व भाकप यांच्याकडून यासंदर्भात सत्ताधारी माकपवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे केरळमधील पिनरायी विजयन सरकारसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. पिनरायी विजयन यांचे विश्वासू अधिकारी अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार आणि आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यामुळेच थ्रिसूर पूरम उत्सवात गोंधळ झाला आणि त्याचा परिणाम म्हणून केरळमधील ही एकमेव लोकसभेची जागा भाजपाच्या पारड्यात पडली असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. अभिनेते-दिग्दर्शक सुरेश गोपी इथून निवडून आले असून त्यांच्याकडे केंद्रात मंत्रीपदही सोपवण्यात आलं आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान

कधी झाला पूरम उत्सवात गोंधळ?

या वर्षीच्या एप्रिल महिन्यात पूरम उत्सवात गोंधळ झाला. केरळमध्ये मतदान होण्याच्या काही दिवस आधी हा सगळा प्रकार झाला. सुरेश गोपी यांच्या विजयानंतर काँग्रेस व माकप या दोघांनी एकमेकांवर भाजपाशी साटंलोटं असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हा वाद निर्माण झाल्यानंतर खुद्द अजित कुमार यांनी मात्र होसबळे यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा अद्याप इन्कार केला नसल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. माकपनं ही भेट पक्षाशी किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही मुद्द्याबाबत नव्हती, अशी भूमिका घेतली आहे.

अजित कुमार यांनी मुख्यमंत्री विजयन यांच्यावतीनेच होसबळेंची भेट घेतली, असा आरोप केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी केला आहे. “विजयन यांनी आत्तापर्यंत होसबळेंना का भेटलात? म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालकांना विचारलंय का? त्यामुळे ते होसबळेंना मुख्यमंत्र्यांच्याच कामासाठी भेटले. पोलीस अधिकाऱ्यांना विविध घोटाळ्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून चालू असणारा तपास प्रभावित करण्यासाठी जबाबदारी सोपवायची ही मुख्यंमत्र्यांची कामाची पद्धतच आहे. पिनरायी विजयन यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी आध्यात्मिक गुरू श्री एम. यांच्या उपस्थितीतही चर्चा केली होती. याआधीही आम्ही माकप व भाजपा यांच्यातील लागेबांधे उघड केले आहेत”, असं सतीशन म्हणाले.

सत्ताधारी माकप पुरस्कृत अपक्ष आमदार पी. व्ही. अन्वर यांनीही पूरम उत्सवात पोलिसांच्या हस्तक्षेपामागे अजित कुमार असल्याचा दावा करून त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

माकपची भूमिका काय?

दरम्यान, या बैठकीशी पक्षाचा संबंध नसल्याची भूमिका माकपचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी मांडली आहे. “काँग्रेसनं थ्रिसूरमध्ये भाजपाशी डील केली. तिथे काँग्रेसचं मतदान कमी झालं आहे. पण विरोधी पक्षनेते ही डील झाकण्यासाठीच सरकारवर आरोप करत आहेत”, असं म्हणतानाच गोविंदन यांनी “अतिरिक्त पोलीस महासंचालकांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होईल”, असंही नमूद केलं आहे.

दुसरीकडे भाकपनंही माकप सरकारवर टीका केली आहे. “अतिरिक्त पोलीस महासंचालकांची संघाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट ही गंभीर बाब आहे. ते संघ सरकार्यवाह होसबळेंना भेटण्यासाठी केरळमधील दुसऱ्या एका संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कारमध्ये गेले होते. तसं पाहता संघ व डाव्या पक्षांमध्ये काही साम्य नाही. त्यामुळे अशी बैठक होताच कामा नये”, असं भाकपचे राज्य सचिव विनय विश्वम यांनी म्हटलं आहे.

भाजपा म्हणते, होय बैठक झाली!

या पार्श्वभूमीवर केरळ भाजपानं अशी बैठक झाल्याचं मान्य केलं आहे. केरळ भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुंदरन यांनी ही बैठक झाली हे मान्य केलं असलं, तरी तिचा पूरम उत्सवात झालेल्या गोंधळाशी संबंध जोडणं त्यांना मान्य नाही. “दत्तात्रय होसबळेंनी अजित कुमार यांची मे २०२३ मध्ये भेट घेतली. मग २०२४ च्या एप्रिल महिन्यातल्या पूरम उत्सवात त्यांनी गोंधळ घडवून आणला हे म्हणण्यात काय अर्थ आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Haryana Election 2024: भाजपाकडून हरियाणात घराणेशाही पॅटर्न; आठ उमेदवारांचा राजकीय वारसा

१९ एप्रिल रोजी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गर्दी नियंत्रणासंदर्भातल्या कारवाईमुळे उत्सवाच्या ठिकाणी गोंधळ झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या काही दिवस आधी पिनरायी विजयन सरकारसमोर पेच निर्माण झाला होता. तेव्हा सुरेश गोपी यांनी मध्यस्थी करून उत्सव आयोजकांना आश्वस्त केलं व सर्व विधी रीतसर घडवून आणण्याचं आश्वासन दिलं. याचा त्यांना २६ एप्रिल रोजी कर्नाटकमध्ये झालेल्या मतदानात फायदा झाल्याचं बोललं जात आहे.

माकप व भाजपा कनेक्शनच्या चर्चा!

गेल्याच आठवड्यात माकपनं पक्षातील वरीष्ठ नेते ई. पी. जयराजन यांची एलडीएफचे समन्वयक या पदावरून गच्छंती केली. भाजपाचे केरळ इनचार्ज प्रकाश जावडेकरांची लोकसभा निवडणुकांपूर्वी भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. २०१६ मध्ये विजयन सरकारने लोकनाथ बेहरा यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवेत असूनही बेहरा यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. त्यावेळीही काँग्रेसकडून ही नियुक्ती भाजपा व आरएसएसच्या वतीने करण्यात आल्याचा आरोप झाला होता. या वर्षी मार्चमध्ये जेव्हा काँग्रेस नेत्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा त्यांचे बंधू के. मुरलीधरन यांनी यामागे लोकनाथ बेहरा असल्याचा दावा केला होता.