सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी केरळमधील सीपीआयच्या (एम) तीन प्रमुख नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मुख्यमंत्री पिनरायी विजयन आणि सीपीआय (एम) पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. सुरेश यांनी केलेल्या आरोपांवर सीपीआयने (एम) अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. याच कारणामुळे येथील विरोधी पक्ष भाजपा आणि काँग्रेसकडून विजयन यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांची वानवा हेच दहशतवादाच्या प्रभावाचे मुख्य कारण – राजनाथ सिंह

स्वप्ना सुरेश यांचा आरोप काय?

सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मल्याळम टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केरळचे माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक, माजी मंदिर व्यवहार मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन या तीन नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित नेत्यांनी लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप स्वप्ना सुरेश यांनी केलेला आहे. आयझॅक आणि सुरेंद्रन यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकारमध्ये काम केलेलं आहे. कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वप्ना सुरेश यांना कोची येथील हॉटेल रूममध्ये कथितपणे बोलवलं होतं. तर थॉमस आयझॅक यांनी तिला मुन्नार येथील थंड हवेच्या ठिकाणी भेटायला बोलावलं होतं. पी श्रीरामकृष्णन यांनी स्वप्ना सुरेश यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं होतं, असे आरोप स्वप्ना सुरेश यांनी केलेले आहेत.

हेही वाचा >>> गुजरातमध्ये ‘पंजाब पॅटर्न!’ आप पक्षाकडून ‘तुम्हीच तुमचा मुख्यमंत्री निवडा’ मोहिमेला सुरुवात; भाजपा, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

पिनराई विजयन यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक

स्वप्ना सुरेश यांनी केलल्या आरोपानंतर केरळमधील काँग्रेस आणि भाजपाने सीपीआय (एम) वर कठोर टीका केली होती. या आरोपानंतर येथील राज्यपाल आरीफ मोहम्मद खान आणि राज्य सरकार यांच्यातील वाद चर्चेत आल्यामुळे सुरेश यांनी केलेले आरोप मागे पडले होते. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला आहे. सौर घोटाळ्यात केरळमधील काँग्रेसच्या नेत्यांचे नाव आल्यानंतर पिनराई विजयन यांनी त्या आरोपांची दखल घेतली होती. विशेष म्हणजे राज्य सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. मात्र स्वप्ना सुरेश यांनी केलेल्या आरोपानंतर विजयन सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. याच कारणामुळे येथील काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे..

हेही वाचा >>> राहुल गांधींच्या यात्रेनिमित्त पश्चिम वऱ्हाडात ‘काँग्रेस जोडो’; रसातळाला गेलेल्या पक्षाला नवे बळ मिळणार?

सीपीआय (एम) पक्षाचं मत काय?

स्पप्ना सुरेश यांनी केलेल्या आपोपानंतर काँग्रेसकडून सीपीआय (एम) ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेते व्ही डी साथिसान यांनी सीपीआय (एम) दुटप्पीपणे वागत आहे, असा आरोप केला आहे. सौर घोटाळ्यासंदर्भात सरिता नायर यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री विजयन यांनी दखल घेतली. मात्र स्वप्ना सुरेश यांनी केलेले आरोप त्यांना महत्त्वाचे आणि विश्वासार्ह वाटत नाहीत. सरीता यांचा आधार घेत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, असे साथिसान म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची ‘घर वापसी’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

दरम्यान, काँग्रेसच्या आरोपांवर सीपीआय (एम) चे राज्य सचिव एम व्ही गोविंदन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्पप्ना सुरेश या विश्वासार्ह नाहीत. त्यांनी जे आरोप केलेले आहेत, ते सर्व निराधार आहेत. याच कारणामुळे या आरोपांवर व्यक्त न होण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे, असे गोविंदन म्हणाले आहेत.

Story img Loader