गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने हरियाणामध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवल्यानंतर आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसनं राज्यातील सर्व १० मतदारसंघ जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मुस्लिम वगळता राज्यातील सर्व प्रमुख समुदायांच्या पाठिंब्यावर काँग्रेसने राज्यातील सर्व प्रभावशाली जातींमधील समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री उशिरा हरियाणातील लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. कुमारी शैलजा यांना सिरसामधून, दीपेंद्र सिंह हुडा यांना रोहतकमधून, वरुण चौधरी यांना अंबालामधून, जय प्रकाश यांना हिसारमधून, दिव्यांशु बुधीराजा यांना कर्नालमधून, सतपाल ब्रह्मचारी यांना सोनीपतमधून, राव दान सिंग यांना भिवानी-महेंद्रगडमधून आणि महेंद्र प्रताप यांना फरीदाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जाट, दलित आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) प्रत्येकी दोन तिकिटे दिली आहेत. पंजाबी आणि ब्राह्मण समाजाला प्रत्येकी एक तिकीट देण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा