तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या नाराजीतूनच काँग्रेसला फायदा झाल्याचे निरीक्षण तेलंगणातील काँग्रेसचे प्रभारी आणि राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नोंदविले. स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती काँग्रेस पक्षामुळे झाली होती. त्याचे श्रेय अखेर काँग्रेसला मिळाले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

चंद्रशेखर राव यांच्या सरकारमध्ये सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता. याचा सामान्य नागरिकांना प्रंचड त्रास होत असे. घराणेशाहीशिवाय कोणाला महत्त्वच मिळत नव्हते. स्वत: चंद्रशेखर राव मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, भाचा मंत्री, मुलगी आमदार व अन्य नातेवाईकही महत्त्वाच्या पदांवर असे चित्र होते. पक्षाच्या मंत्र्यांनाही काहीही अधिकार नव्हते वा त्यांना स्वातंत्र नव्हते. चंद्रशेखर राव यांच्या सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धीच अधिक झाली. या योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळाला नव्हता. नुसती जाहीरातबाजी करून चालत नाही हा तेलंगणाचा संदेश असल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले.

congress in assembly election
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?
Maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभेचे ७० लाख वाढीव मतदान
manoj jarange patil latest marathi news
जरांगे प्रभाव की ‘लाडकी बहीण’? मराठवाड्यात निकालाची उत्सुकता
Maharashtra vidhan sabha election 2024
तावडे यांची राहुल गांधी, खरगेंना नोटीस; २४ तासांत आरोप मागे घ्या, अन्यथा १०० कोटींचा बदनामीचा दावा
pune vidhan sabha vote counting
मतमोजणीस विलंबाची शक्यता? लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत टपाली मतदानात दुपटीने वाढ
congress sachin pilot mahavikas aghadi
‘मविआ’च्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका दिवसात जाहीर करणार, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांची माहिती
administration ready for vote counting postal ballots to be counted first
मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबईत १० ठिकाणी केंद्रे; सुरुवातीला टपाल मतांची मोजणी
no alt text set
नांदेडमध्ये ‘विक्रमादित्य’ कोण, उत्कंठा शिगेला!

हेही वाचा – राजस्थानमध्ये मोदी, ध्रुवीकरण, जातींच्या आधारावर भाजपची सत्तेवर पकड

सामान्य नागरिकांना खोटी आश्वासने दाखवून स्वत:चे महत्त्व वाढविणाऱ्या चंद्रशेखर राव यांचा फुगा फुटल्याचे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. सामान्य नागरिकांमध्ये चंद्रशेखर राव सरकारबद्दल नाराजी होती. ही नाराजी राज्यात फिरताना स्पष्टपणे दिसत होती. या नाराजीचाच काँग्रेसला फायदा झाला.
काँग्रेसने प्रचारात तेलंगणातील सरकारच्या गैरकारभारावर नेमके बोट ठेवले. सरकार सर्व आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे हे जनतेला दाखवून दिले. काँग्रेसने दिलेली पाच आश्वासने लोकांच्या पसंतीस उतरली. त्यातूनच जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे.

हेही वाचा – Assembly Election Result : मिझोराममध्ये अद्याप मतमोजणी नाही; ‘हे’ आहे कारण!

स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी काँग्रेसचे योगदान मोठे होते. तत्कालीन यूपीए सरकारने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला हिरवा कंदिल दाखविला होता. स्वतंत्र तेलंगणा राच्याच्या निर्मितीचे अखेर काँग्रेस पक्षाला श्रेय मिळाले आहे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले. काँग्रेसला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत नेत्याची निवड केली जाईल. याबाबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पुढील निर्णय घेतील, असेही ठाकरे यांनी सांगितले.