चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री पूजा भट्टने काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत बुधवारी हैदराबादमध्ये सहभाग घेतला. तेलंगणा काँग्रेसने भट्ट यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या यात्रेत खासदार राहुल गांधी आणि तेलंगणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या उत्साहात भट्ट सहभागी होताना दिसत आहेत.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी मुकुल वासनिकांची पायपीट
हुसैनीआलम, चारमिनार, मदिना सर्कलपासून इंदिरा गांधींच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर आयमॅक्स सर्कलपर्यंत आठ किलोमीटरची ही पदयात्रा होती. यात्रेच्या ५६ व्या दिवशी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. काँग्रेसची ही पदयात्रा सात सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरू झाली आहे. तेलंगणात पोहोचण्याआधी या यात्रेने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये प्रवास केला आहे.
पुनम कौर यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतील फोटोवरुन वाद
तेलंगणातील या यात्रेत अभिनेत्री पुनम कौर सहभागी झाल्या होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचा हात धरल्याचा फोटो ट्वीट करत भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनी अपमानास्पद टीप्पणी केली होती. यावर स्पष्टीकरण देत यात्रेत पाय घसरून पडताना वाचवण्यासाठी राहुल गांधींनी आपला हार धरल्याचं कौर यांनी म्हटलं होतं. “ते त्यांच्या पणजोबांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत”, असे ट्वीट प्रीती गांधी यांनी राहुल गांधींना उद्देशून केले होते. यावर कौर यांनी सडकून टीका केली होती. “अशाप्रकारची टीका तुमचाच अवमान करणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नारीशक्ती विषयी बोलले होते याची आठवण ठेवा” असं प्रत्युत्तर कौर यांनी प्रीती गांधी यांना दिलं होतं.
राहुल गांधी कळमनुरीच्या मुक्कामात राजीव सातव यांच्या समाधीस्थळास भेट देणार
रोहित वेमुलाच्या आईचाही ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग
हैदराबाद विद्यापीठाचा दिवंगत दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आई राधिका यांनी काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग घेतला. यावेळी राधिका यांनी रोहित वेमुलाला न्याय देण्याची मागणी केली. रोहित वेमुला सामाजिक भेदभाव आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचं प्रतिक असल्याचं ट्वीट राधिका यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी केलं. त्यांनी यात्रेत सहभाग घेतल्यानं मनाला नवी शक्ती मिळाली, असेही गांधी यांनी म्हटले आहे. रोहित वेमुलाने २०१६ मध्ये आत्महत्या केल्यानंतर देशभरात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं.