Maharashtra Congress on EVM: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षांचा दारुण पराभव झाला. त्यातही काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फटका बसला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १३ जागा निवडून आल्या होत्या. तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १०१ जागांवर निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना केवळ १६ जागांवर विजय मिळविता आला आहे. या निकालानंतर काँग्रेसकडून ईव्हीएमवर खापर फोडण्यात येत आहे. काँग्रेस नेते ईव्हीएमवर संशय घेत असून, निवडणूक आयोगावर टीका करीत आहेत. मात्र, हरियाणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला फटका बसण्याचे दुसरेच कारण असल्याचे समोर आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही नेत्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून त्यांना धक्का बसला नाही. कारण- २० नोव्हेंबरपूर्वी राज्यात घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला लोकसभेत मिळवलेले यश कायम राखण्यात अडचणी येतील, असे आधीच समजले होते. जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआला राज्यात घवघवीत यश मिळाले होते.
महायुती आघाडीवर असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट
महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय झाली आणि या योजनेमुळे महायुती सरकारला पाठिंबा मिळत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले होते. २० नोव्हेंबर रोजी मतदान होण्याच्या चार आठवडे आधी ऑक्टोबर महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होता. १०३ विधानसभा मतदारसंघांत घेतल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार लोकसभेला मिळालेली आघाडी मविआ गमावत असल्याचे समोर आले होते. दी इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत या १०३ जागांपैकी ५४ जागांवर मविआ आघाडीवर होती; मात्र सर्वेक्षणानुसार ते केवळ ४४ जागांवर पुढे होते.
हे वाचा >> Eknath Shinde: ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास होतो’, एकनाथ शिंदेंचं असंच होईल का?
महायुतीबाबत बोलायचे झाल्यास, लोकसभा निवडणुकीत महायुती १०३ जागांपैकी केवळ ४९ जागांवर आघाडीवर होती. मात्र, सर्वेक्षणानुसार ते आता ५६ जागांवर आघाडीवर होते. एका जागेवर अपक्ष, तर इतर दोन मतदारसंघांत कोण पुढे किंवा मागे याचा निर्णय अनिर्णीत राहिला. सर्वेक्षणानुसार असेही लक्षात आले की, फक्त मुस्लीमबहुल मतदारसंघांत मविआ ही महाविकास आघाडीच्या पुढे होती. तर खुल्या, ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांत महायुती आघाडीवर होती.
तसेच या सर्वेक्षणातून सर्व वयोगटांतील मतदारांमध्ये मविआपेक्षा महायुतीला अधिक पसंती असल्याचे दिसून आले. खासकरून तरुण मतदारांमध्ये महायुतीबद्दल आकर्षण होते. सर्वेक्षणातील १०३ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ५२, शिवसेना (ठाकरे) पक्षाने २८ व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने २१ ठिकाणी निवडणूक लढविली होती. तर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवली होती.
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सर्वेक्षणाशी संबंधित बाबीसंदर्भात एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, आम्हाला फटका बसणार, हे माहीत होतेच. महायुती आमच्या पुढे आहे, याची कल्पना होती. पण, त्यांच्या विजयाची आणि आमच्या पराभवाची व्याप्ती इतकी मोठी असेल, असे अजिबात वाटले नव्हते. एकंदरीत या निकालाने आश्चर्यचकित केले.
हे ही वाचा >> Eknath Shinde: मोठी बातमी! महायुतीची आजची बैठक रद्द; एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी जाणार, नाराजीनाट्य की वेगळे काही?
‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर
तुम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती आहे का, असा एक प्रश्न या सर्वेक्षणातून विचारण्यात आला होता. ५७,३०९ लोकांपैकी ८८ टक्के जणांनी या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर दिले होते. ८२ टक्के लोकांनी सांगितले की, ते किंवा त्यांच्या कुटुंबातील महिला या योजनेची लाभार्थी आहे. तर, १७ टक्के लोकांनी सांगितले की, या योजनेमुळे त्यांनी आता मतदान करण्याचे प्राधान्य बदलले आहे.
मविआचा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, जाहीरनामा तयार करताना आमच्या रणनीतीकारांनी सांगितले की, लाडकी बहीण या योजनेला राज्यात प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे या योजनेला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडीने प्रतिमहिना ३००० रुपये देण्याचे आश्वासन द्यावे. त्यानंतर महायुतीने ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले.
अपयश झाकण्यासाठी ईव्हीएमवर दोषारोप
काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, लोकसभेत मिळालेली आघाडी टिकवून ठेवण्यात मविआला अडचणी निर्माण होत आहेत, याची नेतृत्वाला जाणीव होती. महिला मतदारांचा महायुतीला पाठिंबा वाढत जात होता. सर्व आकडेवारी नेतृत्वासमोर आहे. तरीही ईव्हीएमला दोष दिला जात आहे. कारण- राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांसाठी हे सोईचे आहे. त्यामुळे दोघांनाही आपले अपयश झाकण्याची आयती संधी मिळत आहे.