इंडिया आघाडीने जानेवारीमध्ये अयोध्येमध्ये पार पडलेल्या राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सरकार राम मंदिराचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी अलीकडेच एका प्रचारसभेमध्ये इंडिया आघाडीवर यावरून जोरदार टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फटका काँग्रेस आणि इंडिया आघाडीला बसेल का, असा प्रश्न उपस्थित होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हा रामाचा अपमान असल्याचा पंतप्रधान मोदींचा दावा
गेल्या मंगळवारी उत्तर प्रदेशमधील पिलिभीत येथे झालेल्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना हा मुद्दा उचलून धरला. त्यांनी असा दावा केला की, विरोधकांनी मंदिराच्या बांधकामात अडथळा आणला असून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुपस्थित राहून प्रभू रामाचाही अनादर केला आहे. एकीकडे संपूर्ण देशामधून या सोहळ्याला चांगलेच समर्थन मिळत असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवली.
पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हे फक्त एक धार्मिक ठिकाण नसून, ते राष्ट्रीय एकात्मता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. राम मंदिर पूर्णत्वाला गेल्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. ते आपल्या प्रचारसभेतील भाषणात म्हणाले, “इंडिया आघाडीने नेहमीच राम मंदिराच्या बांधकामाचा द्वेष केला आहे. तुम्हाला न्यायालयात जे काही करायचे होते, ते तुम्ही केलेच आहे. मात्र, जेव्हा आयोजकांनी तुम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सन्मानाने बोलावले तेव्हाही तुम्ही ते नाकारले आणि प्रभू श्रीरामाचा अनादर केला. ज्यांनी त्यांच्या पक्षामधून या सोहळ्याला उपस्थिती लावली, त्यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर काढण्यात आले. काँग्रेस तुष्टीकरणाच्या राजकारणात इतकी मश्गूल आहे की, ते त्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. काँग्रेसचा जाहीरनामा हा त्यांचा नव्हे, तर मुस्लीम लीगचाच जाहीरनामा वाटतो आहे.”
ज्यांनी हे पाप केले आहे, त्यांना चांगलेच लक्षात ठेवण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केले. पंतप्रधान मोदींनी असे वक्तव्य करून विचारसरणीच्या स्तरावर ध्रुवीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भाजपा नेहमीच आपण हिंदू धर्माचे तारणहार असल्याचे भासवते; तर दुसरीकडे काँग्रेस हे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करते, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पंतप्रधान मोदींनी या वक्तव्याद्वारे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लीम लीगचा जाहीरनामा असल्याचे वक्तव्य या सगळ्या मांडणीला आणखी गडद करण्याचा प्रयत्न करते. विचारधारेच्या स्तरावर काँग्रेसला अधिक मलीन करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे यातून दिसून येते. हा “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीसाठीचा इव्हेंट असल्याचे” सांगत काँग्रेसने या सोहळ्याला उपस्थित राहणे टाळले होते.
हेही वाचा : मोदींना पाठिंबा ही भाजपपेक्षा मनसेची राजकीय गरज ?
काँग्रेसने काय मांडली होती भूमिका?
काँग्रेसने आपल्या एका निवेदनात असे म्हटले होते, “देशातील कोट्यवधी लोक रामाची पूजा करतात. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. मात्र, भाजपा आणि आरएसएसने त्याचे राजकीय हत्यार केले आहे. अयोध्येतील राम मंदिर हा मते मिळविण्यासाठीचा त्यांचा राजकीय प्रकल्प आहे. केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये मते मिळविण्यासाठीच त्यांनी अर्धवट पूर्ण झालेल्या राम मंदिराचे घाई-गडबडीत उद्घाटन केले आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पूर्ण आदर करीत आणि प्रभू रामांवर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या भावनांचाही सन्मान करीत श्री. मल्लिकार्जुन खरगे, श्रीमती सोनिया गांधी व श्री. अधीर रंजन चौधरी यांनी आदरपूर्वक भाजपा आणि आरएसएसने आयोजित केलेल्या या ‘इव्हेंट’ला हजर राहण्यास नकार दिला.”
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसेल?
काँग्रेसच्या या भूमिकेचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो, अशी चिंता काँग्रेसमधीलच अनेक नेत्यांना वाटते. त्यांना अशी भीती वाटते की, भाजपा या संधी साधून, काँग्रेसचे ‘हिंदूविरोधी’ चित्रण करू शकते. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले अर्जुन मोढवाडिया यांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हाच मुद्दा उपस्थित केला आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला नकार देण्याच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता त्यांनी भाजपाची वाट धरली आहे. मात्र, राम मंदिराकडे पाठ फिरविणे ही मोठी चूक असल्याचे त्यांचे मत आहे. जयवीर शेरगिल यांनीही नुकताच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनीही काँग्रेसच्या याच भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊन, लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो, असे त्यांचे मत आहे.
काँग्रेस हा एक हिंदूविरोधी पक्ष असल्याचे भाजपाने केलेले चित्रण खोडून काढणे पक्षाला जड जाईल आणि त्याचा नकारात्मक परिणाम येत्या निवडणुकीत दिसेल, असे अनेक निवडणूक रणनीतीकार सांगतात. ते असा दावा करतात की, राम मंदिराबद्दल पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय रणनीती ठरवणे आणि लोकांना ती पटवून देणे त्यांना अवघड होऊ शकते.
हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
काँग्रेसला करावी लागेल तारेवरची कसरत
राम मंदिराच्या मुद्द्याचे राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो आहे, तर काँग्रेस हा पक्ष बचावात्मक भूमिकेमध्ये आहे. अनेक वर्षांपासून भाजपाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये ‘राम मंदिर’चा मुद्दा राहिला आहे आणि तो आता कुठे पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे भाजपा या मुद्द्याचे राजकारण करणे स्वाभाविक आहे. तसेच इतके अडथळे पार करून मंदिर साकार केल्याने भाजपा हिंदुत्व विचारधारेशी बांधील असल्याचेही त्यातून प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न भाजपाचा राहील. तर दुसरीकडे हा मुद्दा श्रद्धेचा असून, भावनिक राजकारण आणि घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे मूल्य या दोन्हींच्या मध्यावर काँग्रेसला कसरत करावी लागेल. त्यामुळे भाजपा या मुद्द्यांचा असाच वापर करीत राहिला, तर त्यांचा फटका कदाचित काँग्रेसला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
राम मंदिराचा मुद्दा हा अत्यंत भावनिक आणि प्रतीकात्मक असल्याने त्याऐवजी गेल्या १० वर्षांतील रोजगार निर्मिती, विकासाचे मुद्दे, निवडणूक रोख्यांमधील घोटाळे, चीनने सीमाभागात केलेले आक्रमण, मणिपूरमधील बिघडलेले वातावरण, शेतकऱ्यांचे आंदोलन व लडाखमध्ये सुरू असलेले आंदोलन या मुद्दय़ांवर काँग्रेसला ही निवडणूक आणावी लागेल. राम मंदिर या धार्मिक मुद्द्याचा वापर भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही देशाच्या निवडणुकीमध्ये होऊ न देण्यासाठी त्यांना प्रचारासाठीची आपली रणनीती अधिक खोलवर विचार करून तयार करावी लागेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्हीही पक्षांनी नागरिकांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य केले पाहिजे. त्यासाठीचा दबाव विरोधकांनी सत्ताधारी असलेल्या भाजपावर आणला पाहिजे.