महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत बदलांना सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसकडून काल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या नेत्याला या पदावर संधी दिली आहे. सकपाळ हे तुलनेने लोकांना कमी माहिती असलेले, कार्यकर्त्यांचे कमी पाठबळ असणारे पंचायत राज कार्यकर्ते (Panchayati Raj Activist ) आहेत. पक्ष श्रेष्ठींच्या विचारधारेशी जुळवून घेणारे नेते असल्यानेच सकपाळ यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे पटोले हे स्वत:ची वेगळी मते असलेले नेते मानले जातात, पटोले हे काँग्रेसचा विदर्भातील ओबीसींचा आक्रमक चेहरा आहेत ज्यांनी एककाळी पक्षाच्या शेतकरी आघाडीचे नेतृत्व केले आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांना बाजूला सारले जाण्याची शक्यता कमी असून त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली जाऊ शकते.

नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चार वर्ष प्रमुख होते. या कालावधीत पटोले यांच्या स्पष्टवक्त्यापणामुळे त्यांना पक्षात किंवा पक्षाबाहेरही फार कमी मित्र मिळाले. पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या हुकूमशाही पद्धतींविरुद्ध तसेच इतर नेत्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रारी केल्या आहेत.

पटोलेंचं पुढे काय होणार?

इतकं सगळं असूनही ते नेत्यांच्या उतरंडीमध्ये सर्वात वरच्या पदावर टिकून राहिले ते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे, पण आता त्यांना राज्यातील जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांना आता केंद्रात जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ नेत्याने दिली.

बराच काळ काँग्रेसमध्ये असलेले पटोले यांनी २००९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता . त्यांनी त्यावेळी भातशेती शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर आणि विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषांवर काँग्रेस सरकारवर टीका केली होती.

पण २०१७ साली पटोले पुन्हा काँग्रेसमधअये परत आले. यावेळी पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर जिंकलेली भंडारा गोंदियाची जागा सोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर कोणाचेही ऐकत नसल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी हे पाऊल उचलले होते. भाजपच्या बैठकीत शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांना बोलू न दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता.

फेब्रुवारी २०२१ मध्ये महाविकास आघाडी (MVA) चा भाग म्हणून काँग्रेसने महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याची दीड वर्षांनी पटोले यांना काँग्रेसने राज्याचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला, जो महाविकास आघाडीला पुढे चांगलाच महागात पडल्याचे दिसून आले. या राजीनाम्यानंतरमहाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती.

सिवसेनेत फूट पडल्यानंत महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजपाने २०२२ मध्ये सत्ता स्थापन केली, यावेळी विधानसभेत आपल्या पक्षाचा अध्यक्ष नसल्याने भाजपाला रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले नाही.

पटोले यांची स्वत:ची मते, माघार न घेण्याची वृत्ती यासह केंद्रीय नेतृत्वाकडून मिळणारा पाठिंबा तसेच त्यांच्याविरोधात कोणतेही गुन्हेगारी खटले नसणे या सर्व गोष्टी असूनही त्यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अडचणी सोडवता आल्या नाहीत.

उलट कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भासारख्या अनेक भागांमध्ये नाना पटोले यांना स्थानिक नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. नाना पटोले यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबर देखील विनाकारण वाद ओढावून घएतला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि त्यांच्यात झालेल्या संघर्षानंतर आणि २०२४ विधानसभा निवडणुकीत जागावाटपाला उशीर झाला. महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी ढासळण्याचे हे एक कारण सांगितले जाते. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच नाना पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress changes maharashtra chief what happens to nana patole harshvardhan sakpal maharashtra politics rak94