Congress Leader in Nagpur Vidhan Sabha Constituency : काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी मध्य नागपूरमधील उमेदवारावर नाराजी आहे, त्यामुळे प्रतिस्पर्धी गटाचे नेते व कार्यकर्ते दिल्लीत पक्षश्रेष्ठीकडे दाद मागण्यासाठी गेले आहे. दुसरीकडे वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस नेते आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. यात महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री काँग्रेसने उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विदर्भातील नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विकास ठाकरे, प्रफुल गुडधे या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने पुन्हा मैदानात उतरवले आहे. मात्र विदर्भातील रामटेक आणि दक्षिण नागपूरसह मुंबईतील जागांवर काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेनेने विदर्भातील अनेक जागांवर केलेला दावा काँग्रेसला मान्य नाही. हा वाद दिल्लीत काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडे गेला. त्यानंतर बुधवारी प्रत्येकी ८५ जागांचे सूत्रे जाहीर केले आणि उर्वरित जागांवर नंतर निर्णय घेण्यात ठरले. या उर्वरित जागांवर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते शुक्रवारी पुन्हा दिल्लीत पोहोचले आहेत.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Pankaja Munde
Pankaja Munde : महायुतीत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरुन दोन मतप्रवाह; अजित पवारानंतर आता पंकजा मुंडेंनीही मांडली भूमिका
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
Shekhar Shende filed complaint against Dr Pankaj Bhoyer for giving sarees and utensils to women
सरकारी सेवेतील लाडक्या बहिणींना साडी-भांडी; तक्रार होताच आमदार म्हणतात…
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
nitin Tiwari appreciated nitin Gadkari
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत नितीन गडकरींचे कौतुक; नागपुरातील उद्धव ठाकरे गटाचे…

हे ही वाचा… Chimur Assembly Constituency: चिमूर क्रांतिभूमीत भांगडिया विरुद्ध डॉ. वारजुकर यांच्यात लढत; माना समाजाच्या मतदारांची निर्णायक भूमिका

मध्य, पूर्व, दक्षिण नागपूरसाठी कार्यकर्ते आक्रमक

पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला (शरद पवार) देण्यात आली आहे. तर मध्य नागपूरमध्ये काँग्रेसने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांना मध्य नागपूरमध्ये पुन्हा उमेदवार दिली. या मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवारी दिल्ली दाखल झाले असून त्यांनी पूर्व नागपूरची जागा काँग्रेस परत घ्यावी, असा आग्रह धरला. तसेच मध्य नागपूरमध्ये गेल्यावेळी पराभूत झालेल्या शेळके यांना उमेदवारी देण्यात येऊन येथे मुस्लीम किंवा हलबा उमेदवार देण्याची मागणी त्यांची आहे. दक्षिण नागपूरची जागेवरील दावा काँग्रेसने दावा सोडू नये, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या जागेवर काँग्रेसकडून तीन नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.