संजय राऊत

गोंदिया : काँग्रेसने तब्बल २५ वर्षांनंतर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी येथून उमेदवार देण्याची मागणी लावून धरत ‘तुम्ही लढा’ या वृत्तीचे दर्शन घडवले. उमेदवारीचा प्रश्न आल्यावर त्याला बगल कशी देता येईल, याचेच डावपेच रचले गेले. मात्र, सक्षम उमेदवाराअभावी काँग्रेसच्या उमेदवारीचा गाडा पुढे कसा जाणार, असा पेच या निमित्ताने निर्माण झाला आहे.

bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
Supreme Court on Creamy Layer
“…त्यांना आता आरक्षणाबाहेर ठेवायला हवं”, सर्वोच्च न्यायालयाचं रोखठोक मत; म्हणाले, “७५ वर्षांपासून…”
Two school vans of private school with same number plate
भंडारा : धक्कादायक! एकाच नंबर प्लेटच्या दोन स्कूल व्हॅन; त्यातही घरगुती सिलेंडर…
Chikhla village missing kid, missing kid neel forest,
भंडारा : ‘नील’ला नेणारा तो ‘हरा मामा’ कोण ? चार दिवसांनंतर रहस्य…

१९९९ पूर्वी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. माजी खासदार केशवराव पारधी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चौथ्यांदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर प्रफुल पटेल हे काँग्रेसकडून उमेदवार असायचे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथून विजयी झाले होते. मात्र, २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांमध्ये भाजप खासदाराने येथून विजय मिळवला.

आणखी वाचा-शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात घरातच दुहीची बिजे

एकंदरीत, या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता काँग्रेसला २५ वर्षांचा वनवास भोगावा लागला आहे. आता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसने भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत विधानसभा मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. ‘इंडिया’ आघाडीत जागा वाटपाचे नेमके काय सूत्र ठरते आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातो, हे येणारा काळच सांगेल.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही या मतदारसंघावरचा आपला दावा कायम ठेवला आहे. सध्या या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांचासुद्धा या मतदारसंघावर दावा राहीलच. यावर भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाची महायुती काय मार्ग काढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे काँग्रेसला या मतदार संघात मोठी संधी निर्माण झाल्याचे चित्र आहे. या अनुकूल वातावरणाचा पूर्णपणे लाभ घेण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

आणखी वाचा-औरंगाबादमध्ये विजयासाठी भाजपला हवा एमआयएमचा उमेदवार, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यातून अपरिहार्यता स्पष्ट

उमेदवार वेळेवर जाहीर करणार

काँग्रेसने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात आधी संघटनबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला आहे. मतदारसंघासाठी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निश्चित करेल त्याच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे उभे राहतील. उमेदवारीवरून आतापासूनच पक्षात वाद नको म्हणून वेळेवर नाव जाहीर करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. काँग्रेसचे गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड आणि भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दोन्ही जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदार, जातीनिहाय मतदारांची संख्या, कोणता उमेदवार सक्षम ठरू शकेल, याचा संपूर्ण अभ्यास सुरू केला आहे.

संकल्प पदयात्रा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ३ ते १३ सप्टेंबरदरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यात संकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे. पटोले व काँग्रेस नेते या पदयात्रेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील गावे पिंजून काढतील आणि गावकऱ्यांशी संवाद साधतील.

Story img Loader