नागपूर : राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षाच्या कामगिरीची घसरण का झाली, याबाबत चर्चा सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थाने याची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतरच झाली होती. लोकसभेसह काही निवडणुकांचा अपवाद वगळता या पक्षाने निचांक गाठला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाची पदे मिळाली. निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने त्याचे श्रेयही पटोले यांना मिळत गेले. त्यामुळे ते पक्षात नशीबवान समजले जात होते. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या वाताहतीसाठी पटोलेंच्या नेतृत्वालाच जबाबदार धरले जात आहे. मुळात पटोले यांनी विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा देणे ही घटना पक्षाच्या घसरणीला कारणीभूत ठरली होती. त्यानंतर पक्ष सावरलाच नाही. त्याला अपवाद ठरल्या विदर्भातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका. पण पटोलेंच्या नेतृत्वात लढवल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची निचांकी कामगिरी झाली. त्यामुळे आता त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे.