Amit Shah Controversy Congress demands Home Minister’s resignation : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत (संसदेच्या हिवाळी अधिवेशनात) संविधानावरील चर्चेदरम्यान केलेल्या एका टिप्पणीमुळे ते वादात अडकले आहेत. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे हे अमित शाह यांच्या वक्तव्यावरून कळून येतंय”, अशी टीका काँग्रेसने केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खरगे म्हणाले, “अमित शाह यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा”. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे काय पाप आहे का? त्यांनी आंबेडकरांवरून वक्तव्य केलं तेव्हा मी सभागृहातच त्यांना उत्तर देणार होतो. परंतु, सभागृहाचं कामकाज चालू असल्यामुळे त्यात व्यत्यय आणणं मला योग्य वाटलं नाही.

अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचं नाव सारखं सारखं घेण्याची फॅशनच झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचं नाव घेतलं तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” हे वक्तव्य करण्याआधी अमित शाह म्हणाले होते की “तुम्ही १०० वेळा जरी आंबेडकरांचं नाव घेतलं तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटतं, ते मी सांगतो”. अमित शाह यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून या वक्तव्याचा निषेध नोंदवला. “ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, त्यांना आंबेडकरांची अडचण असते”, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली एक्सवर केली आहे.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

हे ही वाचा >> ‘मी विधानसभेचा राजीनामा देणार नाही’, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत पक्षात चालेल्या राजकारणाबद्दल काय माहिती दिली?

ज्येष्ठ काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी देखील अमित शाह यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती घृणा आहे, हे अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून येतंय. आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत आहेत. जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत.

बाबासाहेब आमच्यासाठी ईश्वरासमान आहेत : खरगे

पाठोपाठ राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील अमित शाह यांच्यावर टीका केली. “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला. अशोक चक्राला त्यांचा विरोध होता. संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती, मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी ते होऊ दिले नाही. म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का?”, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “अमित शाहांनी बाबासाहेबांचा अपमान केला आहे. त्यामुळेच मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खरंतर, मोदींच्या मंत्रिमंडळातील लोकांना समजलं पाहिजे की बाबासाहेब आमच्यासह देशातील जनतेसाठी ईश्वरापेक्षा कमी नाहीत. ते दलित, आदिवासी, वंचित, अल्पसंख्याकांसह गोरगरिबांचे कैवारी आहेत”.

हे ही वाचा >> One Nation, One Election Bill : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाविरोधातील लढाईत विरोधकांची सरशी? वाचा नियम काय सांगतात

मोदींकडून अमित शाह यांचा बचाव

अमित शाह यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे काँग्रेससह विरोधकांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, अमित शाह यांचा बचाव करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरसावले आहेत. मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक ठरेल. भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलं आहे की कसं एका कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या एका पक्षानं डॉ. आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटिल गोष्टी केल्या”.

हे ही वाचा >> Delhi Elections 2025 : आम आदमी पार्टीने ‘त्या’ १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं?

दरम्यान, मोदींनी या पोस्ट्समध्ये एक एक यादीच दिली असून त्यातून काँग्रेसनं कशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, यासंदर्भात काही दावे केले आहेत. “एकदा नसून दोनदा बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करणे, पंडित नेहरूंनी डॉ. आंबेडकरांविरोधात प्रचार करणे आणि त्यांचा पराभव मोठा मुद्दा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ नाकारणे, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देणे या गोष्टींचा काँग्रेसनं डॉ. आंबेडकरांचा अवमान केलेल्या गोष्टींच्या यादीत समावेश होतो”, असंही पंतप्रधानांनी पुढे म्हटलं आहे.

केजरीवालांचा भाजपाला टोला

दरम्यान, काँग्रेसपाठोपाठ आम आदमी पार्टीने देखील यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. आपचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की ज्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम असेल त्यांनी भाजपाला नाकारायला हवं.

Story img Loader