मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तसेच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याकरिता प्रवक्त्यांची भलीमोठी यादी तयार केली असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने नेते व प्रवक्त्यांची १५ जणांची फौज तयार केली आहे. परिणामी भाजप आणि काँग्रेसमध्ये आता वाकयुद्ध बघायला मिळणार आहे.

सत्ताधारी पक्षाकडून खोटे कथानक तयार करून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. भाजपचा माहिती तंत्रज्ञान विभाग विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, चित्रफिती खाडाखोड करून किंवा त्यात बदल करून समाज माध्यमांमधून प्रसारित करीत आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी १५ नेत्यांकडे जबाबदारी सोपविल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता

कुणाकडे जबाबदारी?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा या १५ नेत्यांकडे जबाबदारी सोपावण्यात आली आहे. हे नेते पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमाशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत मांडणार आहेत. समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे असेल.

हेही वाचा >>>आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे

भाजपच्या यादीत नितेश राणे यांचा समावेश नाही

भाजपने सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी विविध नेत्यांची फौजच सज्ज केली आहे. त्यात पंकजा मुंडे, आशीष शेलार, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण आदींचा समावेश आहे. भाजपच्या या यादीत आमदार नितेश राणे यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही. सध्या संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी राणे पार पाडतात. पण नवीन यादीत राणे यांचे नाव नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते.

Story img Loader