नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद वाढत असल्याने पक्षश्रेष्ठीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना शनिवारी दिल्लीत बोलावून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काही दिवसांआधी वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात कुणबी समाजाच्या कार्यक्रमात वडेट्टीवारांचे प्रत्यक्ष नाव न घेता यांच्याविरुद्ध वक्तव्य केले होते. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही अल्पसंख्य आपल्यावर राज्य करीत आहेत. आता परिवर्तनाची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. वडेट्टीवार यांनी याबाबत पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पटोलेंसह धानोरकर आणि वडेट्टीवार यांना दिल्लीला शनिवारी पाचारण केले.

हेही वाचा : PM Modi Election Rallies: हरियाणात विजय मिळवणं भाजपासाठी महत्त्वाचं का? ही आहेत तीन कारणे…

वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे. खासदार बंडू धानोरकर यांच्या अकाली निधानानंतर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला होता तर त्याचवेळी वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी शिवानीसाठी जोर लावला. तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये मतभेद वाढत गेले आणि धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्याने ते अधिक गंभीर झाले. त्यामुळे पक्षक्षेष्ठींनी त्यांना बोलावून घेतल्याचे समजते.

हेही वाचा : हरियाणामध्ये ‘आप’ला बळ; केजरीवाल यांच्या सुटकेमुळे नेते, कार्यकर्त्यांची भावना

२३ सप्टेंबरला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक होती. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत देखील चर्चा करण्यात आली.

प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress high command called nana patole vijay wadettiwar and pratibha dhanorkar in delhi print politics news css