देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची २३ जून रोजी पटणा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. या बैठकीनंतर देशातील राजकारणाची दिशा बदलू शकते, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीदेखील पटणा येथील बैठक ही एक देशाच्या राजकारणातील महत्त्वाची घटना होती. या बैठकीमुळे देशातील राजकारणाची दिशा बदलणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बैठकीमुळे राजकारणाची दिशा बदलणार- चौधरी

अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनी पटणा येथील विरोधकांची बैठक आणि पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणूक यावर भाष्य केले आहे. “२०२४ ची लोकसभा निवडणूक पाहता पटणा येथील विरोधकांची बैठक ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. या बैठकीमुळे देशातील सांप्रदायिक शक्तींविरोधात आघाडी करण्यास चालना मिळणार आहे. या बैठकीमुळे भारतातील राजकारणाची दिशा बदलणार आहे,” असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

पटण्यातील बैठक पश्चिम आणि बंगालमधील हिंसाचार याचा संबंध नाही

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. यावरही चौधरी यांनी भाष्य केले. मात्र पश्चिम बंगालमधील घटना आणि पटणा येथील बैठक याचा काहीही संबंध नाही, असे चौधरी म्हणाले.

ममता बॅनर्जी आमच्यावर आरोप करीत आहेत, आम्हीदेखील…

“पटणा येथे जे काही घडले त्याचा पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीवर काहीही परिणाम पडणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आमच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप करत आहेत. आम्हीदेखील पंचायत निवडणुका आयोजित करताना त्या कोठे कमी पडल्या, हे समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. या निवडणुका अगोदरच हिंसाचाराने रंगल्या आहेत. रोज माध्यमांत हिंसाचाराच्या घटना दाखवल्या जात आहेत. त्यामुळे आपण या घटनांना नाकारू शकत नाही,” असे चौधरी म्हणाले.

आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो तरी…

यासह पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आमनेसामने असले तरी आमच्यासाठी पटणा येथील बैठकही महत्त्वाची आहे, असेही अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केले.