तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का देत रविवारी पश्चिम बंगालमधील ४२ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर आता इंडिया आघाडीतील पक्षाकडून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेसनेही तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ममता बॅनर्जी या अशा राजकारणी आहेत; ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले आहे. “ममता बॅनर्जी या संपूर्ण ४२ जागांवर उमेदवार उभे करतील, हे मी तुम्हाला आधीच सांगितले होते. मात्र, माझ्या पक्षाला ममता बॅनर्जी यांच्याकडून अपेक्षा होती. आज ना उद्या त्या इंडिया आघाडीत सहभागी होतील, असे त्यांना वाटत होते. मात्र, ही आशा फोल ठरली”, असे ते म्हणाले.

Appointments of 23 officers who joined the Indian Administrative Service Mumbai news
भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
thane Marathi Ekikaran Samiti condemned Marathi family brutally beaten and attacked incident
कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी मराठी एकीकरण समिती रिंगणात
BJP wins in Maharashtra Haryana due to Narendra Modi influence
मोदींच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, हरियाणात भाजपचा विजय; ‘दी मॅट्रीझ’ संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
chhagan bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal: मंत्रीपद नव्हे, छगन भुजबळांसाठी राज्यपालपद? भाजपा आमदाराचं मोठं विधान; नेमकं घडतंय काय?
Ministers profile
मंत्र्यांची ओळख : अँड. माणिक कोकाटे, संजय सावकारे, जयकुमार रावल, नरहरी झिरवळ

हेही वाचा – टीडीपीची एनडीएमध्ये घरवापसी! याचा फायदा नेमका कुणाला? टीडीपी की, भाजपा?

“खरे तर ममता बॅनर्जी यांना खरंच सांप्रदायिक शक्तींविरोधात लढायचे असते, तर त्यांनी इंडिया आघाडीबरोबर युती केली असती. मात्र, त्यांनी इंडिया आघाडीचा प्रस्ताव धुडकावून लावला. ममता बॅनर्जी या अशा राजकारणी आहेत की, ज्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे”, अशी टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने बहिरमपूर येथून माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात विचारले असता, “माझ्याविरोधात कोणालाही उमेदवारी दिली तरी मला काहीही अडचण नाही. खरे तर ममता बॅनर्जी या अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून एक प्रकारे भाजपाला मदत करीत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“टीएमसीला जर युसूफ पठाण यांना खासदार करायचेच होते, तर त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र, भाजपाला मदत करण्यासाठी त्यांनी युसूफ पठाण यांना लोकसभेची उमेदवारी दिली”, असेही ते म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे बहिरमपूर मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची मते निर्णायक आहेत. २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसने माजी आमदार अपूर्वा सरकार यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अधीर रंजन चौधरी यांनी जवळपास ७९ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता.

या संदर्भात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही प्रतिक्रिया दिली. “पश्चिम बंगालमधील जागावाटपाबाबत काँग्रेसने अनेकदा ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत, असेही आम्ही सांगितले. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्यावर नेमका कोणता दबाव होता हे आम्हाला माहीत नाही. इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात निवडणूक लढवावी, अशीच काँग्रेसची भूमिका आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – भाजपला प्रादेशिक पक्षांच्या मैत्रीची आवश्यकता का भासू लागली ?

दरम्यान, काँग्रेसच्या टीकेला तृणमूल काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही एकतर्फी निर्णय घेऊन ४२ जागांवर उमेदवार दिले, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र, त्यांनी मेघालयमध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेत, एकतर्फी उमेदवार जाहीर केले. खरे तर काँग्रेस नेत्यांना वस्तुस्थिती माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी दिली.

ममता बॅनर्जींच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालमध्ये सीपीआयशी युती करणे हा काँग्रेससमोर एक पर्याय आहे. मात्र, केरळमध्ये काँग्रेस आणि सीपीआय विरोधात निवडणूक लढवीत आहेत. एवढेच नाही, तर सीपीआयचे नेते डी. राजा यांनी राहुल गांधी यांच्या वायनाडमधून निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरून टीकाही केली आहे. राहुल गांधी यांनी केरळमधून निवडणूक लढविण्यापेक्षा अशा जागेची निवड करावी, जिथे त्यांचा सामना थेट भाजपाशी होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे पश्चिम बंगालमधील अशी युती होत असेल, तर दोन्ही पक्ष कशा पद्धतीने राजकारण करतात, हे बघणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader