सौरभ कुलश्रेष्ठ

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबरच काँग्रेसनेही महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रचारासाठी जबाबदारी टाकली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दक्षिण गुजरातमधील तीन मतदारसंघांमधील प्रचारसभांची जबाबदारी टाकण्यात आली. सर्वसमावेशक विकास आणि स्थानिक कामगारांचे होणारे शोषण या मुद्यांवर भर देत अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला मत देण्यासाठी मतदारांना साद घातली.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. मराठी भाषिकांची मोठी संख्या असलेल्या दक्षिण गुजरातमधील सुरत, नवसारी या दोन मराठीबहुल जिल्ह्यांमध्ये अशोक चव्हाण यांच्यावर प्रचारसभा घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यानुसार जलालपूर (जिल्हा नवसारी), लिंबायत व उधना (जिल्हा सुरत) या तीन मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी जाहीर सभा घेतल्या. या तीनही मतदारसंघांचा प्रचार २९ नोव्हेंबरला संपत असून १ डिसेंबरला मतदान होईल.

हेही वाचा: ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?

विकासाच्या गुजरात मॉडेलमधील फोलपणा आणि सर्वसमावेशकतेचा अभाव, सामाजिक वातावरण, आर्थिक धोरणांचा व्यावसायिक-व्यापारावर होणारा परिणाम अशा व्यापक विषयांबरोबरच मतदारसंघनिहाय स्थानिक जिव्हाळ्याच्या विषयांवर अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा भर ठेवला. जलालपूरमध्ये दरवर्षी प्रचंड पाऊस होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई असते याकडे लक्ष वेधत अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारच्या नियोजनविषयक अकार्यक्षमतेवर बोट ठेवत आणि इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच अनेक लघु व मध्यम उद्योगही बंद पडल्याने वाढलेली बेरोजगारी व एकट्या नवसारी जिल्ह्यात अडीच लाखांपेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांची नोंद असल्यावरून चव्हाण यांनी गुजरात सरकारवर टीकास्त्र सोडले.

तर लिंबायत व उधना या मतदारसंघातील सभेत हिरे, कपडासह इतर व्यवसाय, उद्योगात मोठ्या संख्येने असलेल्या महाराष्ट्रासह देशभरातील कर्मचारी, कामगारांची व्यथा चव्हाण यांनी मांडली. कामगार कायदे सौम्य केल्याने आपले शोषण होत असल्याची कामगारांची भावना. १२-१२ तास काम करून पुरेसे वेतन मिळत नसल्याची टीका करत कामगार वर्गातील असंतोषाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. मराठी व उत्तर भारतीय नागरिकांच्या पाल्यांना एससी, एसटी, ओबीसीचे दाखले मिळत नसल्याची तक्रार असल्यावरूनही त्यांनी गुजरात सरकारला धारेवर धरले.

हेही वाचा: कबड्डीच्या मैदानातून रायगडमध्ये शिवसेना -शेकाप राजकीय तह …

गुजरातमधील विकासाचा भाजप खूप गवगवा करते. पण तो सर्वसमावेशक विकास नाही. गुजरातमध्ये अल्पसंख्य विकास विभागच नाही. अल्पसंख्य म्हणजे केवळ मुस्लीम नव्हे तर जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन अशा अनेक समुदायांचा समावेश त्यात होतो याचे भान भाजप सरकारला उरलेले नाही. संपूर्ण गुजरातचा विचार करता वाढती महागाई, बेरोजगारी, नोकरीतील असुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व्यवस्थेकडे सरकारचे दुर्लक्ष, शेतमालाचे भाव, अल्पसंख्यांक, आदिवासी, दलितांकडे होणारे दुर्लक्ष आदी विषय महत्त्वाचे असून लोकांमधील असंतोषाचा परिणाम निवडणुकीत दिसेल. आम आदमी पक्षाचा फार परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही, असे अशोक चव्हाण यांनी नमूद केले.

Story img Loader