नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या’ या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर निशाणा साधत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी बुधवारी त्यांना ‘लक्ष विचलित करणे थांबवा आणि देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करा, असे म्हटले आहे. मुंबईत नोकरीसाठी जमलेल्या गर्दीचा चित्रफीत प्रसिद्ध झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!

एअर इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी १६ जुलै रोजी मोठ्या संख्येने तरुण मुंबई विमानतळावर पोहोचले होते. तेथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केली. त्यात म्हणाल्या, ‘काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मुंबईत म्हणत होते की, आम्ही इतक्या कोटी लोकांना रोजगार देऊन विक्रम मोडला आहे. बेरोजगारांच्या प्रचंड गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे. याच मुंबईत काही रिक्त पदांसाठी आलेले लोक दिसत आहेत, याआधी गुजरातमधील एका हॉटेलमध्ये २५ जागांसाठी १५ लाख बेरोजगार आले होते आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून हे दिसून येते की रेकॉर्ड नक्कीच मोडला गेला आहे, परंतु तो बेरोजगारीचा. देश ऐतिहासिक बेरोजगारीचा सामना करत आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader priyanka gandhi criticizes pm modi over job creation for youth zws
Show comments