मुंबई : आमदार खरेदी करून सरकार चोरण्यात आले. चोरी करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आपले प्रकल्प पळविण्यात आले, जमिनी दुसऱ्याला दिल्या. हे सर्व चित्र बदलण्यासाठी पुन्हा तुमचे सरकार बनवा, महाराष्ट्राचे सरकार बनवा, असे आवाहन राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत केले. संविधान संपल्यास भारतातील गरीब, आदिवासींजवळ काही राहणार नाही. शिक्षण, आरोग्य, जमिनीचे संरक्षण संविधान करते. संविधानामुळेच अदानींना काही प्रमाणात रोखण्यात यश आल्याचेही राहुल यांनी या वेळी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया आघाडीची संयुक्त जाहीर सभा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील घटकपक्ष व मित्रपक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. या वेळी राहुल गांधी यांनी राज्यातील महिलांसाठी ‘महालक्ष्मी’ योजना आणि ‘जातीनिहाय जनगणने’ची घोषणा करताना सरकारवर टीका केली. महायुतीचे सरकार लवकरच जाणार असून, महविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार आल्यानंतर राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा ३,००० रुपये ‘खटा खट्.. खटा खट्… खटा खट्… ’ जमा होतील. ही योजना जाहीर करण्यामागे महिलांना या सरकारमध्ये पोहोचलेली महागाईची झळ, बेरोजगारीच्या झळेतून दिलासा मिळावा, हा उद्देश असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा >>>Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष

भारतातील संस्था, माध्यमे, न्यायव्यवस्था पाहतो, तेव्हा त्या संस्थांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि खुल्या प्रवर्गातील गरीब लोक दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला देशात एक ऐतिहासिक पाऊल उचलून जातनिहाय जनगणना करावी लागेल. लोकसभा निवडणुकीत सांगितले होते, की केंद्रात आमचे सरकार बनल्यास जातिनिहाय जनगणना केली जाईल. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणनेचे काम सुरू केले आहे. जनगणनेसाठी प्रश्न बंद दाराआड तयार केले जातात, मात्र तेलंगणातील सर्वेक्षणात प्रश्न जनतेने ठरवलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात सरकार आल्यास जातिनिहाय जनगणनेचे काम सुरू करणार असल्याचे राहुल यांनी सांगितले.