Ramesh Chennithala On Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील नेते आणि इंडिया आघाडीचे दिल्लीतील नेते देखील महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होत आहेत. या प्रचारांच्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला हे महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यात तळ ठोकून आहेत. ते काँग्रेस पक्षाची रणनीती तयार करत असून महाविकास आघाडीतील पक्षांबरोबर समन्वय देखील साधत आहेत. दरम्यान, रमेश चेन्निथला यांनी एका मुलाखतीत बोलताना राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. हरियाणा विधानसभेचा निकाल आणि जम्मूतील काँग्रेस पक्षाच्या कामगिरीनंतर आता महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे काँग्रेस कशा पद्धतीने पाहत आहे? या प्रश्नावर रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, हरियाणा आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. संसदीय निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीने मिळून महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला. मुद्दे वेगळे, रणनीती वेगळी आणि लोकांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. शिवाय हरियाणातूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळेच आता ८० टक्के बंडखोरांनी माघार घेतली. आता सर्व आम्ही एकजुटीने लढत आहोत, मग ते नेते असोत, कार्यकर्ते असोत, मित्रपक्ष असोत. आम्ही पक्षात पूर्ण एकजूट ठेवली. ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाहीत. आमच्या आघाडीत देखील मतभेद नाहीत. जागावाटप देखील योग्य पद्धतीने झाले. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. सीपीएम, सीपीआय, पीडब्ल्यूपी (शेतकरी आणि कामगार पक्ष) आणि सपा सारख्या लहान पक्षांनी देखील दिलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले. त्यामुळे हरियाणाप्रमाणे काँग्रेस वा आघाडीत अडचण नाही.

हेही वाचा : सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

राज्यात काही मैत्रीपूर्ण लढती आहेत का? यावर ते रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची मैत्रीपूर्ण लढाई होऊ देणार नाही. आम्ही त्या सर्व बंडखोरांना निलंबित केले आहे. ज्या बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही, त्यांना आम्ही निलंबित केलं आहे. आता सांगलीचा प्रयोग पुन्हा होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे दलित मतांचे एकत्रीकरण होते. संविधान वाचवा या घोषणेला आता राज्याच्या निवडणुकीत काही महत्त्व असेल का? यावर बोलताना रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, संविधान बदलाचा धोका अजूनही कायम आहे. भाजपाला राज्यघटनेची मूलभूत रचना बदलायची आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा प्रस्ताव पाहा. राज्याच्या निवडणुका त्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जोपर्यंत भाजपाला राज्यसभेत बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ते असे वादग्रस्त ठराव पास करू शकत नाहीत. त्यामुळे अधिक आमदार भाजपासोबत असल्यास ते राज्यसभेचे अधिक खासदार निवडून आणू शकतात आणि राज्यसभेत बहुमत मिळवून ते राज्यघटना बदलू शकतात. या सगळ्याची जाणीव जनतेला आहे. आणि राहुल गांधींच्या ‘संविधान संमेलना’ने लोकांच्या सर्व घटकांना विशेषत: दलित आणि मागासवर्गीयांना (ओबीसी) योग्य दिशा दिली आहे, असं मत त्यांनी मांडलं.

राज्याच्या निवडणुकीत कोणते मुद्दे आहेत? यावर चेन्निथला म्हणाले, अनेक मुद्दे आहेत, त्यामध्ये कांदा, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, पिकांच्या किमतीत वाढ, आयात-निर्यात धोरणामुळे नुकसान. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे गुजरातने महाराष्ट्रातील सर्व मोठे प्रकल्प आणि गुंतवणूक हिसकावून घेतले.

काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांबरोबर आघाडी का केली नाही? त्यांचा पक्ष आता अडचणी निर्माण करणार नाही का? या प्रश्नावर बोलताना रमेश चेन्निथला म्हणाले, प्रकाश आंबेडकर भाजपाची बी टीम आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याच्याशी अनेकदा बोललो. पण त्यांनी आम्हाला साथ दिली नाही. ते नेहमीच भाजपाला मदत करत असतात आणि लोकांना ते माहीत आहे. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. महाराष्ट्रात मल्लिकार्जुन खर्गे (जे अस्खलितपणे मराठी बोलू शकतात) यांची उपस्थिती देखील दलितांना महाविकास आघाडीच्या मागे एकत्र करण्यात मदत करत आहे.

हेही वाचा : “सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर परिणाम होईल, अशी टीका काँग्रेसने केली. पण आता महाविकास आघाडीने अनेक सवलतींचं आश्वासन दिलंय? यावर रमेश चेन्निथला म्हणाले की, या सरकारमुळे जीडीपी वाढीचा दर घसरला आहे. हमीभावाबाबत, आम्ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक वित्त आणि आर्थिक स्थितीचा व्यापक अभ्यास केला होता. आम्ही विविध स्त्रोतांद्वारे अधिक महसूल वाढवण्याची योजना आखत आहोत आणि आम्ही नक्कीच आम्ही दिलेले आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आमची योजना स्पष्ट आहे.

काँग्रेस आणि भाजपामध्ये ७२ जागांवर थेट लढत असून त्यापैकी ३६ एकट्या विदर्भात आहेत. भाजपाशी स्पर्धा करण्यासाठी तुमची रणनीती काय आहे? यावर ते म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये लढत आहे. आम्ही तिथे मोठ्या दिमाखात जिंकणार आहोत. आमच्याकडे एक योजना आहे. दोन्ही भागात शेतकऱ्यांचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. कापूस, कांदा, सोयाबीनचे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या याच भागात झाल्या आहेत. केंद्राने याकडे लक्ष दिले नाही. केंद्राच्या आयात-निर्यात धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हे कधीच विसरणार नाही. विदर्भ हा प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीतही हे स्पष्ट झाले. आम्हाला वाटते की आम्ही या क्षेत्रात चांगली कामगिरी करू.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास काँग्रेस का उत्सुक नाही? या प्रश्नावर रमेश चेन्निथला म्हणाले की, काँग्रेस कधीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत नाही. काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवत असली तरी आम्ही हे करणार नाही. निवडणुकीनंतर बसून ते ठरवता येते, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, महाविकास आघाडीला यश मिळालं तर पुढचा मुख्यमंत्री सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा असेल का? या प्रश्वावर चेन्निथला यांनी निवडणुकीनंतरच याबाबत निर्णय घेऊ, असं मत मांडलं.