छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही वसंत चव्हाण यांनी नांदेडचा गड राखला खरा पण आता दिल्लीत किंवा राज्यात उमेदवारी देताना आपल्याला नेता कोण या विचाराने ‘आता तुम्हीच लक्ष द्या साहेब’ अशी विनंती नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हणमंत बेटमोगरेकरांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. खासदार कल्याण काळे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, ही भावना मराठवाड्यात काँग्रेसचे प्राबल्य असणाऱ्या अनेक मतदारसंघातून हाेत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातून चार आमदार निवडून आले होते. मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा समावेश होता. यातील काही आमदार काँग्रेसमध्ये असले तरी ते अशोकराव चव्हाण यांच्याबरोबर जातील अशी चर्चा गेली अनेक दिवस आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जितेश अंतापूरकर यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला नसल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडेही केली आहे. अन्यही एका आमदाराचे नाव चर्चेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जरी काँग्रेसचा विजय झाला असला तरी पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीची गरज असल्याचे कार्यकर्ते आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे आता आम्हाला काेणी वाली उरला नाही, आता तुम्हीच लक्ष घाला अशी विनंती बेटमोगरेकरांनी केली आहे. दुसरीकडे संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे आता जालन्याचे खासदार झाले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी जालना मतदारसंघात २० दिवस खूप काम केल्याचे सांगत माजी आमदार नामदेव पवार यांनी मलाही निवडणूक लढावायची आहे, किमान जिल्हाध्यक्ष पद तरी मिळावे अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या समक्ष व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर पुनर्बांधणीची मागणी विविध ठिकाणांहून होत आहे. त्यामुळेच काँग्रेसनेही विविध नेत्यांचे दौरे प्रस्तावित केले आहेत.

Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Congress stays away from power can there be happiness in country
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
Badlapur incident, congress protest in nagpur, congress alleges bjp over badlapur case, badlapur school case, Badlapur sexual abuse Case child torture, Maharashtra, Congress,
“बदलापूरमधील ती शाळा भाजपा आणि संघाशी संबंधित,” काँग्रेसचा आरोप…
Congress president Mallikarjun Kharge criticizes central government regarding MNREGA scheme
मनरेगा हे मोदींच्या ग्रामीण भारताच्या विश्वासघाताचे ‘जिवंत स्मारक’; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
National Organization Secretary notice to BJP leaders regarding Assembly elections 2024 nagpur
“विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या,” राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

हेही वाचा – तिरकी टोपी आणि पायघोळ धोतर…!

हेही वाचा – परभणीचे बाबाजानी दुर्राणी पुन्हा स्वगृही !

कॉग्रेसचे नेते ऑगस्टमध्ये मराठवाड्यात

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांना १० ते १४ ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात दौरा करण्याचे निर्देश दिले आहेत. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे दोन मतदारसंघांची बैठक होणार आहे. नांदेड येथे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तर १२ ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीमध्ये नव्या रचना केल्या जातात का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.