नांदेड ः मुखेडचे माजी राज्यमंत्री मधुकरराव घाटे, भोकरचे माजी आमदार बाबासाहेब गोरठेकर, किनवटचे सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर, २०१४ साली मुखेडहून विधानसभेवर निवडून गेलेले गोविंद राठोड आणि देगलूरचे रावसाहेब अंतापूरकर  यांच्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावर असताना मृत्यू पावलेले जिल्ह्यातील सातवे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात नजीकच्या काळात लोकसभेची पोटनिवडणूक अपरिहार्य झाली आहे.

नांदेडच्या राजकीय इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडात काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांचीही नोंद झाली आहे. १९५१-५२च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९८४-८५ पर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग अथवा कारण घडले नव्हते. पण १९८६ साली शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर १९८७ साली जिल्ह्यात पहिल्या पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाची नोंद झाली होती.

aarya jadhao called suraj chavan
आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
thane mns avinash Jadhav
अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर मनसे नेते अविनाश जाधव नतमस्तक
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
avinash Jadhav anand ashram
उमेदवारी जाहीर होताच मनसेचे अविनाश जाधव आनंद आश्रमात
anna bansode
पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव
maharashtra assembly elections congress first list of 62 candidates
काँग्रेसची ६२ जागांची पहिली यादी आज; ९६ उमेदवारांवर शिक्कामोर्तब; शिवसेनेबरोबरचा वाद मिटवण्याची जबाबदारी थोरातांवर
bjp leader dilip bhoir
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत

हेही वाचा >>>उमेदवारीवरून गडचिरोली भाजपमध्ये गटबाजीला उधाण; विद्यमान आणि इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच

पुढच्या म्हणजे १९९०च्या दशकात जिल्ह्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झाल्या. १९९२ साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच वर्षात तेथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भीमराव केराम यांच्या अनपेक्षित विजयाची नोंद झाली. त्यानंतर १९९०-९५ या विधानसभेतील मुखेडचे आमदार मधुकरराव घाटे यांचे १९९४च्या अखेरीस निधन झाले. पण त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही. याच दशकाच्या अखेरीस बिलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खतगावकर हे १९९८ साली लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण निवडून आले होते.

पुढील काही वर्षांनी सन २००३ सालच्या गणेशोत्सवाच्या समारोपदिनी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचे श्री विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झाले. त्यानंतर वर्षभराचा कालावधी असतानाही या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत खेडकरांच्या पत्नी अनसूयाताई शिवसेनेतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. याच काळात भोकरचे तत्कालीन आमदार बाबासाहेब गोरठेकर हेही विधिमंडळाचे सदस्य असताना दीर्घ आजाराने मरण पावलेे. पण त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग आला नाही.

हेही वाचा >>>‘श्रीमंत बहिणी’ही सरकारी योजनेच्या लाभार्थी, अजित पवार यांना आला अनुभव

सन २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष गोविंद राठोड हे भाजपातर्फे निवडून आले होते, पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी नांदेड-मुंबई रेल्वे प्रवासातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे या मतदारसंघात २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राठोड यांचे पुत्र डॉ.तुषार पहिल्या प्रयत्नातच आमदार झाले. २०१९ साली देगलूर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांचे करोना काळात २०२१ साली निधन झाले. त्यानंतर काही महिन्यांनी या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अंतापूरकरांचे पुत्र जीतेश यांना उमेदवारी देऊन आपली जागा राखली होती.

आमदारांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे चार विधानसभा मतदारसंघांनी पोटनिवडणुकांचा अनुभव घेतल्यावर अलीकडेच लोकसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचे दोन आठवड्यांच्या आजारपणानंतर  २६ ऑगस्ट रोजी निधन झाल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणखी एका पोटनिवडणुकीची नोंद होईल.