हरियाणा लोकसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेसवर वरचढ ठरला. अशात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नुकतंच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने हरियाणा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तोशामच्या आमदार आणि माजी मंत्री किरण चौधरी आणि त्यांची कन्या श्रुती चौधरी या दोन्ही माय-लेकींनी भाजपात प्रवेश केला. त्या राज्य काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांपैकी एक आहेत. किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सून आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षांतराचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, यावर एक नजर टाकू या.

काय आहेत हरियाणा काँग्रेसची समीकरणे?

२००८ मध्ये हुड्डा आणि किरण यांच्यात मतभेद सुरू झाले. तत्कालीन मुख्यमंत्री हुड्डा यांनी किरण यांना पर्यावरण खात्यातून काढून टाकले. परंतु, या प्रकरणात पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. २०२२ मध्ये दोन्ही नेत्यांमधील संबंध आणखी ताणले गेले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवानी-महेंद्रगड जागेसाठी काँग्रेसने हुड्डा यांचे निष्ठावंत मानले जाणार्‍या राव धनसिंग यांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, किरण यांना त्यांची लेक श्रुतीची त्या जागेसाठी निवड करणे अपेक्षित होते. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद आणखी वाढले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Who spent money on Sunetra Pawars campaign
सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा खर्च कोणी केला?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
independent winner candidates
कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Nana Patoles visit to Akola and the Controversial equation remains
नाना पटोलेंचा अकोला दौरा अन् वादाचे समीकरण कायम
After defeat of Ajit Pawars NCP in Pimpri-Chinchwad former corporators office bearers are uneasy
अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार?

हेही वाचा : “मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?

त्यानंतरच त्या काँग्रेसमधून बाहेर पडण्याची चर्चा जोर धरू लागली. शैलजा कुमारी यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. “श्रुती यांच्यावर अन्याय झाल्यामुळे किरण यांची नाराजी स्वाभाविक आहे. योग्य व्यक्तीला तिकीट वाटप करण्यात आले असते तर आम्ही निवडणुकीत विजय मिळवू शकलो असतो. उदाहरणार्थ, श्रुती यांना महेंद्रगडमधून तिकीट मिळाले असते, तर आम्ही भिवानी-महेंद्रगड जिंकले असतो,” असे त्या म्हणाल्या.

काँग्रेसमध्ये लोकसभा तिकिटावरील वाद काय होता?

हुड्डा यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. तसेच विधानसभा निवडणुकीतही राज्याच्या ९० विधानसभा जागांपैकी ४६ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान किरण यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. हुड्डा यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीच त्यांच्या मुलीला तिकीट नाकारले. धनसिंग यांच्यासाठी प्रचार न केल्याचा आरोपही किरण यांच्यावर करण्यात आला. धनसिंग यांचा भाजपाच्या धरमबीर सिंग यांच्याकडून ४० हजार मतांनी पराभव झाला, या जागेवरून किरण यांनी मागील चार निवडणुका सलग जिंकल्या आहेत.

हुड्डा यांनी तिकीट वाटपावरून किरणच्या आरोपांवर टीका केली होती. “ही त्यांची विचारसरणी आहे, यावेळी काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत इंडिया आघाडीने हरियाणामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवले आहे,” असे ते म्हणाले. किरण यांच्या समर्थकांना त्या पक्षात एकटे पडल्या असल्याची खंत वाटू लागली. “हुड्डा यांनी सर्व निर्णय घेतल्याने, आमच्याकडे काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय नव्हता,” असे किरण यांच्या जवळच्या सहकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. परंतु, हुड्डा समर्थकांचा असा दावा आहे की, त्यांच्या बाहेर पडल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या संभाव्यतेवर काहीही परिणाम होणार नाही.

या पक्षांतराचा काँग्रेसवर काय परिणाम होणार?

किरण आणि श्रुती यांच्या राजीनाम्याने हरियाणा काँग्रेसमध्ये हुड्डा यांचे वर्चस्व बळकट होण्याची शक्यता आहे. “हुड्डा हे हरियाणातील सर्व ३६ बिरादारी (समुदाय)चे नेते आहेत. पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन चालण्यावर त्यांचा विश्वास आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ७० हून अधिक जागा जिंकेल,” असे काँग्रेसचे आमदार आणि हुड्डा यांचे जवळचे सहकारी कुलदीप वत्स यांनी सांगितले.

दुसरीकडे, हुड्डा यांचे पक्षातील टीकाकार वरिष्ठ नेत्यांच्या बाहेर पडण्याचा दोष त्यांना देतील. “किरण यांनी काँग्रेसमध्ये राहावे अशी आमची इच्छा होती, पण त्यांनी पक्षात अनेक अडचणींचा सामना केला आहे,” असे शैलजा यांनी सांगितले. दरम्यान, किरण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या काही तासांनंतर, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (सीएलपी) उपनेते आफताब अहमद आणि मुख्य व्हीप बी. बी. बत्रा यांनी यासंदर्भात सभापती ज्ञानचंद गुप्ता यांना पत्र लिहून किरण यांना विधानसभेतून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद? कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष?

भाजपाला या पक्षांतराचा फायदा होणार का?

किरण यांनी पक्षात प्रवेश केल्याने भाजपा भिवानी येथे विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला पाया मजबूत करण्याच्या तयारीत आहे. या प्रदेशात स्वर्गीय बन्सीलाल यांना खूप आदर आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगदी अगोदर, जाट नेते ब्रिजेंद्र सिंह आणि त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्ष सोडल्याने भाजपाला धक्का बसला होता. किरण यादेखील जाट समुदायातील असल्याने भाजपाला विश्वास आहे की, त्यांच्यामुळे जाट समाज भाजपाकडे आकर्षित होईल. हरियाणात राज्याच्या लोकसंख्येच्या जवळजवळ एक चतुर्थांश जाट मतदार आहेत.