हरियाणामधील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचा कार्यकर्ता मोनू मानेसर याला अटक केल्यानंतर आता काँग्रेसचा आमदार मम्मन खान यालाही शुक्रवारी (१५ सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. मम्मन खानच्या अटकेमुळे भाजपाने कारवाईमध्ये संतुलन राखले असल्याची चर्चा आहे. नूह हिंसाचारामागील प्रमुख आरोपी आणि स्वयंघोषित गोरक्षक मोनू मानेसरला मंगळवारी (१२ सप्टेंबर) अटक करण्यात आली होती. मानेसरच्या अटकेनंतर बजरंग दलाचे राज्य समन्वयक भारत भूषण यांनी भाजपाने विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.

मम्मन खान यांच्या अटकेमुळे हरियाणाच्या दक्षिण प्रांतात असलेल्या जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी भाजपाला आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या मनसुब्यावर आता पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. दक्षिण प्रांतातील मेवात क्षेत्रात मुस्लीम समुदायाची त्यातही मेव मुस्लीम समुदायाची लोकसंख्या लक्षणीय असून मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि इंडियन नॅशनल लोक दल (INLD) या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले होते. सध्या मेवातमधील सर्व तीन आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. फिरोजपूर झिरकामधून मम्मन खान, नूह विधानसभा मतदारसंघातून आफताब अहमद आणि पुन्हाना विधानसभेतून मोहम्मद इलियास या आमदारांचा समावेश होतो.

crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Pannuns Sikhs for Justice is dangerous to India
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनची ‘सिख्स फॉर जस्टीस’ संघटना भारतासाठी धोकादायक का आहे?
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट

हे वाचा >> हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?

जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत नूह जिल्ह्यात हिंसाचार उफाळल्याचे पाहायला मिळाले होते. मम्मन खान यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळेच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार झाला, असा आरोप भाजपाकडून सातत्याने होत आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांनीदेखील मम्मन खान याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून या हिंसाचारामागे काँग्रेस पक्षाचा हात असल्याचा आरोप केला. खान यांनी पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्य सरकारच्या कारवाईविरोधात दाद मागितली आहे. राज्य सरकारने पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून तपास चालविला असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे.

काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितल्यानुसार, भाजपाने अल्पसंख्याक समुदायातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला बळीचा बकरा केल्याचा आरोप करून या कारवाईनंतर काँग्रेस पक्ष आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मानेसर आणि मम्मन खान यांच्या अटकेनंतर भाजपाकडून मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सत्ताधारी भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराचे खापर काँग्रेस पक्षावर फोडले जाईल, असा प्रयत्न होत आहे. २९ ऑगस्ट रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनातही काँग्रेस पक्षावर दोषारोप करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला.

काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते भूपिंदर सिंह हुडा द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “नूह हिंसाचाराबाबत न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी मी पहिल्या दिवसांपासून करत आहे. मुख्यमंत्र्यांनी (खट्टर) सांगितले होते की, पूर्वनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडविला गेला. हिंसाचारानंतर मी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली होती. उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली या घटनेची चौकशी व्हावी, जेणेकरून या हिंसाचारामागे कुणी कटकारस्थान रचले त्याची माहिती बाहेर येऊ शकेल, अशी मागणी मी केली होती. मी कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कुणाचाही विरोध करत नाही. जे कुणी दोषी असतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.”

राज्य पोलिस तपास करण्यासाठी सक्षम नाहीत का? असा प्रश्न द इंडियन एक्सप्रेसकडून विचारला असता भूपिंदर हुडा म्हणाले की, सरकारच्या कार्यपद्धतीबाबत आम्हाला शंका वाटते. ज्या दिवशी हिंसाचार घडला, त्या दिवशी राज्याचे गृहमंत्री म्हणाले की, त्यांना दुपारी ३ वाजता एका खासगी व्यक्तीकडून या हिंसाचाराची माहिती कळली. गृहमंत्र्यांकडे गुन्हे अन्वेषण विभागाची गुप्तचर यंत्रणा नाही का? राज्यात काय चालले आहे, याची माहिती त्यांना मिळत नाही. हरियाणात सध्या अशीच परिस्थिती असून यावरून सरकारच्या कार्यपद्धतीचा अंदाज घेता येऊ शकतो.

हे वाचा >> बाबरच्या विरोधात लढणारे ‘मेव मुस्लीम’ कोण आहेत? नूह हिंसाचारानंतर पुन्हा चर्चेत का आले?

हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने शुक्रवारी (१५ सप्टेंबर) राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून आमदार मम्मन खान यांना अटक केली. त्याआधी हरियाणाचे अतिरिक्त महाधिवक्ता दीपक सबरवाल यांनी उच्च न्यायालयात निवेदन देऊन आमदारांना अटक करणार असल्याची माहिती दिली. नूह हिंसाचारप्रकरणी दाखल झालेल्या एका एफआयआरमध्ये आमदार खान यांचे नाव असल्याचा दाखला यावेळी उच्च न्यायालयात देण्यात आला.

मम्मन खान यांच्या नावाचा उल्लेख असलेला एफआयआर १ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. यामध्ये ५२ लोकांवर दोषारोप ठेवले होते. त्यापैकी ४२ लोकांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये मम्मन खान याचा निकटवर्तीय असलेल्या तौफिक खान यालाही अटक करण्यात आलेली आहे. द इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिकला ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली, त्यानेच नूह हिंसाचारात मम्मन खान यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानंतर मम्मन खान यांच्या फोनमधील २९ जुलै आणि ३० जुलै रोजीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि पुरावे गोळा केल्यानंतर आमदार खान यांना ताब्यात घेतले. ज्यादिवशी हिंसाचार घडला, त्यादिवशी म्हणजे ३० जुलै रोजी मम्मन खान घटनास्थळी उपस्थित होते, अशी साक्ष जय प्रकाश आणि प्रदीप यांनी दिली आहे.

“कुणालाही घाबरण्याची गरज नाही. मी तुमच्यासाठी विधानसभेत लढत आलो आहे, आता मेवातसाठीही संघर्ष करत आहे”, असा स्टेटस व्हॉट्सअपवर काँग्रेस आमदार खान यांनी ३० जुलै रोजी ठेवला होता. या स्टेटसमधील मजकूरही त्यांच्या अटकेसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. पोलिसांनी अब्दुल्ला खान नामक आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. “इंजिनिअर मम्मन खान यांनी मोहीम फत्ते केली”, असा मजकूर अब्दुल्लाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

Story img Loader