काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेनं हरियाणात प्रवेश केला आहे. यानिमित्त काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही अशा पदयात्रेत चालावं, असे आदेश राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा यांनी दिले आहेत. महिन्यातून एकदा प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आणि नेत्याला किमान १५ किलोमीटर पदयात्रेत चालावं लागेल, अशी निर्देशवजा सूचना दोतसरा यांनी दिली. मंगळवारी ‘भारत जोडो’ यात्रेनं राजस्थानमधून हरियाणात प्रवेश केला आहे. यानंतर दोतसरा यांनी हे निर्देश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतसरा म्हणाले की, “पक्षाचे प्रत्येक मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्याला महिन्यातून एकदा १५ किलोमीटर चालणं अनिवार्य असेल. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कम्युनिकेशनचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.

हेही वाचा- “मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…”, ‘भारत जोडो’ यात्रेबाबत राहुल गांधींचं विधान

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना दोतसरा म्हणाले, “राजस्थानमध्ये सत्ता आणि संघटना मिळून काम करू. पक्षाचा प्रत्येक मंत्री आमदार, कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना गावागावांत निघणाऱ्या पदयात्रेत १५ किलोमीटर चालावं लागेल. महिन्यातून एक दिवस चालणं अनिवार्य असेल. २६ किंवा २७ जानेवारीपासून महिन्यातून एक दिवस पदयात्रेत चालण्याचा निर्णय घेऊ. जर कुणाला संघटनेत काम करायचं असेल, पद हवं असेल, आमदार राहायचं असेल, मंत्री राहायचं असेल तर त्यांना पदयात्रेत १५ किलोमीटर चालावं लागेल. महिन्यातील एक दिवस त्यांना गावातील लोकांबरोबर पदयात्रेत चालावं लागेल, हे आम्ही सुनिश्चित करू,” असं दोतसरा म्हणाले.

हेही वाचा- Rafale Watch : तामिळनाडूत भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या महागड्या ‘राफेल’ घड्याळावरून वादंग

खरं तर, सोमवारी अलवर येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये मिनी यात्रा काढण्याची सूचना केली. “राजस्थानमध्ये काँग्रेसचे ३० मंत्री आहेत, ३३ जिल्हे आहेत. प्रत्येक मंत्र्याला एक जिल्हा द्या आणि त्यांना १५ किलोमीटर लोकांमध्ये फिरायला लावा.” राहुल गांधींच्या सूचनेनंतर दोतसरा यांनी राजस्थानमध्ये मिनी पदयात्रा काढण्याची योजना आखली आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याला पदयात्रेत चालणं अनिवार्य केलं आहे.