कर्नाटक राज्यात या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर येथे काँग्रेसने महिलांना प्रति महिना २ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मेघालयमध्ये विस्तार करू पाहणाऱ्या तृणमूल काँग्रेसनेही येथील महिलांना प्रतिमहिना एक हजार रुपयांचे आर्थक सहाय्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. मागील वर्षात हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रसचे सरकार आले. तर पंजामध्ये आम आदमी पार्टीने (आप) सरकारची स्थापना केली. या दोन्ही पक्षांनी महिलांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये या आश्वासनांची पूर्तता झालेली आहे की नाही यावर एकदा नजर टाकुया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमाचल प्रदेशमध्ये मागील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. ही निवडणूक काँग्रेसने जिंकली असून येथे सत्तेत आल्यास आम्ही १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना १५०० रुपयांचे प्रतिमहिना आर्थिक सहाय्य करू असे आश्वासन दिले होते. तर आप पक्षाने महिलांना प्रतिमहिना १००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा >>गुजरातमध्ये काँग्रेस अ‍ॅक्शन मोडमध्ये, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ३८ नेत्यांची हकालपट्टी!

पंजाब : लवकरच महिलांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन

पंजाबमध्ये सध्या आप पक्षाचे सरकार आहे. येथे सत्तेत आल्यानंतर सरकारने ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे सरकार महिलांना प्रतिमहना १००० हजार रुपये देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण करू शकलेले नाही. पंजाबच्या समाजकल्याण, महिला व बालविकासमंत्री बलजित कैर यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच महिलांना प्रतिमहिना १००० रुपये देण्यास सुरुवात होई. त्यासाठीची माहिती गोळा करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >> “नितीश कुमारांची ‘समाधान यात्रा’ म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा…”, प्रशांत किशोर यांची बोचरी टीका

अद्याप खात्यात रक्कम जमा झालेली नाही

हिमाचल प्रदेश सध्या आर्थिक अडचणीत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसने येथील सरकार सुखविंदर सिंग सुखू यांच्या हातात सोपवले आहे. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. काँग्रेसने निवडणुकीदरम्यान महिलांना प्रतिमहिना आर्थिक मदत दिली जाईल, असे म्हणत फॉर्म वितरित केले होते. या फॉर्मवर महिलांना त्यांचे मोबाईल क्रमांक, नाव, तसेच पत्ता टाकण्यास सांगण्यात आले होते. मात्र अद्याप महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. त्यावेळी महिलांकडून चांगला प्रतिसाद दिला जात असल्याचा दावा काँग्रेसे केला होता.

हेही वाचा >> उस्मानाबादेत पीकविम्यावरून शिवसेना – भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण

लवकरच योजनेला एक निश्चित आकार दिला जाईल

याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांनी सविस्तर भाष्य केले आहे. “निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दूरदृष्टी आहे. महिलांना आर्थिक मदत, नोकरी तसेच अन्य आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकाकडून आर्थिक पुर्ततेवर चर्चा केली जात आहे. लवकरच या योजनेला एक निश्चित आकार दिला जाईल,” असे सल्लागारांनी सांगितले आहे.

दरम्यान, भाजपाने हाच मुद्दा घेऊन हिमाचल प्रदेशमधील सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली आहे. ही नागरिकांची फसवणूक असून त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नाही, असा आरोप भाजपाने केला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress promises 2000 assistance in karnataka women know congress where are himachal pradesh and punjab promises prd