रायबरेली आणि अमेठी हे लोकसभेचे दोन मतदारसंघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ मानले जातात. जवळपास पहिल्या निवडणुकीपासूनच गांधी कुटुंबीयांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष असते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन मतदारसंघातून कोण लढणार आहे, याची घोषणा अद्यापही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी यांनी या सर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे.

अमेठी-रायबरेलीतून काँग्रेसकडून अद्याप उमेदवार नाही

या मतदार संघांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात दिरंगाई केली जात असल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जात आहेत. राहुल गांधी अमेठीतून लढतील तर प्रियांका गांधी रायबरेलीतून अशा चर्चा रंगल्या आहेत. इथपर्यंत होणाऱ्या चर्चा ठीक होत्या, मात्र आता या साऱ्या तर्कवितर्कांमध्ये वरुण गांधी यांनाही खेचले जात आहे. काँग्रेसकडून वरुण गांधी यांना रायबरेलीचे तिकीट मिळेल की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. कारण, भाजपाने वरुण गांधी यांना पिलीभीतमधून उमेदवारी देणे नाकारले असल्याने त्यांच्यासमोर वेगवेगळे पर्याय उभे राहिले आहेत. याआधी काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनीही त्यांना काँग्रेस प्रवेशाचा सांगावा धाडला आहे, त्यामुळे या चर्चा अधिक जोरकसपणे सुरू आहेत.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kangana Ranuat in nagpur
Kangana Ranaut : “हिमाचलच्या कुशीत जन्म पण महाराष्ट्राने…” नागपुरातील सभा कंगना रणौत यांनी गाजवली!
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
rebellion of jayashree patil three way contest in the sangli assembly constituency
सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
mla maulana mufti ismail vs asif sheikh maharashtra assembly election 2024
लक्षवेधी लढत : धार्मिक वलय मौलाना मुफ्ती यांना किती उपयुक्त?
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला

हेही वाचा : राजपूत, जाट समुदाय भाजपावर नाराज आहेत का? राजस्थान भाजपा प्रमुख सांगतात…

वरुण गांधी रायबरेलीतून लढणार?

याबाबत विचारले असता वरुण गांधी यांनी स्पष्टपणे कशावरही भाष्य केलेले नाही. त्यांनी हे दावे फेटाळलेही नाहीत आणि त्यांना दुजारोही दिलेला नाही. ते म्हणाले की, “जर काही गोष्टींवर गोपनीय चर्चा झाली असेल तर अशा गोष्टींवर सार्वजनिकपणे भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. तसेही व्यक्ती कोण आहे यावर नव्हे, तर मुद्द्याच्या आधारावर निवडणूक लढवली गेली पाहिजे, असे मला वाटते.”

वरुण गांधींना नेमके काय म्हणायचे आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. मात्र, दोन्हीपैकी कोणत्याही जागेवर लढण्याची त्यांची शक्यता जराही कमी झालेली नाही. १९५२ आणि १९५७ मध्ये रायबरेली मतदारसंघात त्यांचे आजोबा फिरोज गांधी यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९६७, १९७१ आणि १९८० मधून इंदिरा गांधी यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर हा वारसा सोनिया गांधींनी चालवला आणि त्यांनी २००४ ते २०१९ पर्यंत इथून निवडणूक लढवली आहे.

प्रियांका गांधी उतरणार का निवडणुकीच्या मैदानात?

रायबरेलीमधून प्रियांका गांधी निवडणूक लढतील का, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्या यापूर्वी कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या नाहीत. त्या रायबरेलीमधून पहिली निवडणूक लढवतील, अशा चर्चा मात्र जोरदार आहेत. दुसरीकडे, २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी अमेठीमधून पुन्हा मैदानात उतरतील का, हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, दोघांनीही या जागांवरून निवडणूक लढवावी, असा दबाव कार्यकर्ते त्यांच्यावर टाकत आहेत, अशी चर्चा आहे.

प्रियांका गांधी यांची टीम रायबरेलीमध्ये सक्रिय झाली आहे. रायबरेलीमधून २०१९ पर्यंत सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवली असली तरी आता तब्येतीचे कारण देत त्यांनी राज्यसभा जागेवरून संसदेत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे रायबरेलीमध्ये प्रियांका गांधी, तर अमेठीमध्ये राहुल गांधी निवडणूक लढवतील, अशी सकारात्मक लक्षणे असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

२६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे. त्यानंतर अमेठीमधूनही राहुल गांधी लोकसभेची निवडणूक लढणार का, याची घोषणा पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अमेठीमध्ये निवडणूक लढवून ते जिंकले तरीही त्यांनी अमेठीसाठी वायनाड मतदारसंघ सोडावा, अशी पक्षाची इच्छा नाही. मात्र, ते दोन्हीही मतदारसंघांचा विचार करत आहेत, ही गोष्ट स्पष्ट आहे.

गांधी विरुद्ध गांधी?

दुसरीकडे, भाजपानेच जर वरुण गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवारी दिली तर तिथे ‘गांधी विरुद्ध गांधी’ अशी निवडणूक होऊ शकते. काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघामध्ये शह देण्यासाठी टाकलेला हा डाव नक्कीच प्रभावी ठरू शकतो. मात्र, वरुण गांधी आणि भाजपाचे वरिष्ठ नेते यांच्यात सगळेच आलबेल आहे, असे वाटत नाही. कारण वरुण गांधी यांनी वेळप्रसंगी आपल्याच सरकारवर टीका केली आहे, त्यामुळे असे काही होईल, अशी शक्यता कमी आहे.

याबाबत बोलताना भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, “वरुण गांधी यांना पिलीभीत म्हणून तिकीट दिलेले नाही, त्यामुळे त्यांना प्रियांका गांधींविरोधात मैदानात उतरवले तर संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागेल.”

खरे तर वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी या दोघांनाही यावेळी तिकीट मिळणार नसल्याची चर्चा जोरदार होती. मात्र, सरतेशेवटी भाजपाने मनेका गांधी यांना सुलतानपूर मतदारसंघामध्ये तिकीट दिले आहे. वरुण गांधी यांचा रोष शमवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला असे काहींचे मत आहे.

जर प्रियांका गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेससाठी ही एका नव्या प्रकरणाची सुरुवात असेल. त्या जागेवर आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपादेखील निवडणूक लढवेल, यात शंका नाही. कारण याआधीच रायबरेली मतदारसंघातील दोन आमदार भाजपाने आपल्या गळाला लावले आहेत. समाजवादी पक्षाचे मनोज पांडे आणि काँग्रेसच्या आदिती सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी इंडिया आघाडीची ताकद कमी झाली आहे.
तरीही अमेठीशी तुलना करता रायबरेली हा मतदारसंघ जिंकणे काँग्रेससाठी सोपे आहे. या ठिकाणी अनुसूचित जातीची ३० टक्के मते आहेत. या मतदारसंघातून लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सोनिया गांधी यांनी ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवली आहेत.

वरुण गांधी पक्षश्रेष्ठींवर नाराज

या महिन्याच्या सुरुवातीला प्रियांका गांधी यांनी राजस्थानमधील दौसामध्ये दौरा केला होता. या ठिकाणी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. प्रियांका आणि वरुण गांधी एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतील अशी शक्यता कमी आहे. नेहरु-गांधी घराण्याच्या या दोन शाखा सध्या राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात असल्या तरीही त्या दोघांचेही नाते जिव्हाळ्याचे मानले जाते, त्यामुळे अशी लढत होणे कठीण आहे.

राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने वरुण गांधी यांच्यासाठी २०२४ ची ही निवडणूक निर्णायक मानली जाते. पक्षाबरोबर उडालेल्या खटक्यांचा इतिहास पाहता, जर वरुण यांनी भाजपाला रामराम केला तर काँग्रेसची दारे त्यांच्यासाठी उघडी होऊ शकतात. तसेच ते एखाद्या प्रादेशिक पक्षामध्येही जाऊ शकतात. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध चांगले असल्याचे म्हटले जाते. अलीकडेच पिलीभीतमध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी वरुण यांचे कौतुकही केले होते.

हेही वाचा : सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

मात्र, वरुण यांच्यासाठी समाजवादी पक्षाचा पर्यायही कठीण ठरू शकतो. कारण एका बाजूला त्यांची आई सुलतानपूरमधून भाजपाचे प्रतिनिधित्व करत आहे. दुसरीकडे, त्यांनी इंडिया आघाडीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढणे त्यांच्यासाठीच सोपे जाणार नाही. ते आपल्याच मतदारांना या बाबतचे स्पष्टीकरण काय देणार, हादेखील प्रश्न आहे.

काय घडेल ते येणारा काळ ठरवेलच. मात्र, दोन गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. काँग्रेसला आपली ताकद पणाला लावून रायबरेली आणि अमेठीमधून निवडणूक जिंकावी लागेल. दुसरीकडे वरुण यांचा विचार करता त्यांना येत्या आठवड्याभरात हाताला काही लागले नाही तर आईच्या आश्रयाखाली राहावे लागेल आणि पुन्हा कधीतरी लढण्याची तयारी करावी लागेल. वय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी अशा दोन्ही गोष्टी त्यांच्या बाजूला आहेत, ही जमेची बाजू!