काँग्रेसने मध्य प्रदेश, छतीसगढ आणि तेलंगणा या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या राज्यांतील पक्षाच्या कप्तानांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मध्य प्रदेशमध्ये १४४, छत्तीसगढमध्ये ३० व तेलंगणामध्ये ५५ उमेदवारांची घोषणा रविवारी करण्यात आली. तीनही राज्यांमध्ये ओबीसी, दलित व आदिवासी समीकरण साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कमलनाथ परंपरागत छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल व उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव हे दोघेही आपापले बालेकिल्ले असलेल्या पाटन व अंबिकापूरमधून निवडणूक लढवतील. तेलंगणामध्ये प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील प्रमुख नेता ए. रेवन्त रेड्डी यांना कोडंगल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व नेत्यांकडे आपापल्या राज्यातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोपवली आहे.

amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
mp shrikant shinde
“आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गणपत गायकवाड यांचा प्रचार करा !”, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य
vidarbh election
विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती की महायुतीला कौल? 
Four candidates from Nashik absent from PM Narendra Modis meeting
मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा : भाजपमध्ये दिया कुमारी या वसुंधराराजे यांना पर्याय ठरू शकतील का ?

मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडामधून कमलनाथ यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची निवडणूक लढवण्यासंदर्भातील अनिश्चितता संपुष्टात आली आहे. राज्यातील दुसरे बलाढ्य नेते दिग्विजय सिंह यांची मर्जी सांभाळण्यात आली असून त्यांचे पुत्र जयवर्धन यांना राघीघाट तर, दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांना चचोरामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवराजसिंह विरोधात ‘बजरंगबली’

विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विरोधात बुधनी मतदारसंघात हनुमानाचे पात्र रंगवणाऱ्या विक्रम मस्ताल शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. २००८ मध्ये प्रसारित झालेल्या रामायण मालिकेत विक्रम यांनी हनुमानाची भूमिका केली होती. मध्य प्रदेशमध्ये ‘बजरंगबली’ हा राजकीय मुद्दा बनला असून कमलनाथ सातत्याने आपण बजरंगबलीचे भक्त असल्याचे सांगत आहेत. बजरंगबलीचे आशीर्वाद असल्याचा प्रचार करत कमलनाथ यांनी भाजपकडून हिंदुत्ववादी मुद्दा हिसकावून घेतला आहे. भाजपने ‘इंदौर-१’ मधून राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात विद्यमान आमदार संजय शुक्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. उमा भारतींचा मतदारसंघ मलहरामधून काँग्रेसने साध्वी राम सिया यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा : हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीने अशोक चव्हाण संतापले, राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित

काका-पुतण्याची तिसऱ्यांदा लढत

छत्तीसगढमधील पाटन मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांचे पुतणे व दुर्गचे विद्यमान भाजप खासदार विजय बघेल यांच्यात तिसऱ्यांदा लढाई होणार आहे. २००८ मध्ये पुतण्याने काकाचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला २०१३ मध्ये काकाने घेतला. २०१८ मध्ये भाजपने पुतण्याला उमेदवारी दिली नाही. आता पुन्हा दोन्ही बघेलांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत.

हेही वाचा : जरांगे-पाटील यांच्या दबावापुढे सरकार झुकणार का?

आता राजस्थानची प्रतीक्षा

राजस्थानचे उमेदवारही निश्चित केले जात असून एखाद-दोन दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. मध्य प्रदेशमध्ये पहिल्या यादीत काँग्रेसने ३० अनुसूचित जमाती, २२ अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. इथे १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगढमध्ये जाहीर झालेल्या ३० पैकी १४ उमेदवार अनसूचित जातींचे आहेत. ३ महिलांनाही उमेदवारी दिली आहे. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांचे स्पर्धक व माजी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार यांना हुजूरनगरमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. इथे काँग्रेसकडून माकप व भाकपला प्रत्येकी दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.