एक्झिट पोलच्या अंदाजानुसार एनडीएला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळत नसल्याचे आणि २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्यातही भाजपाला अपयश आल्याचे चित्र आहे. काँग्रेसने मात्र अनेक जागांवर भाजपाला मागे टाकले आहे. पंजाबमध्ये काँग्रेस लोकसभेच्या १३ पैकी सात जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडीचा भाग असलेला काँग्रेसचा मित्रपक्ष सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे. यंदा पंजाबमध्ये दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. खादूर साहिबमधून तुरुंगात असलेल्या वारिस पंजाब डे प्रमुख अमृतपाल सिंग आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजित सिंगचा फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून विजय होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरोमणी अकाली दलाची पंजाबमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. शिरोमणी अकाली दलाला केवळ भटिंडा मतदारसंघात विजय मिळण्याची शक्यता आहे. या जागेवरून माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल आघाडीवर आहेत. आनंदपूर साहिबमधून विद्यमान खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा चौथ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी, अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणींचा पराभव

२०१९ मध्ये काँग्रेसने पंजाबमध्ये आठ जागा जिंकल्या होत्या, अकाली दल आणि भाजपा (एकत्र लढले होते) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा आपने जिंकली होती. सध्या पंजाबमध्ये काँग्रेस अमृतसर (जी एस औजला), गुरदासपूर (सुखजिंदर सिंग रंधवा), फतेहगढ साहिब (डॉ. अमर सिंग), फिरोजपूर (शेर सिंग घुबया), जालंधर (चरणजित सिंग चन्नी), लुधियाना (पीपीसीसी प्रमुख अमरिंदर सिंग राजा वॉरिंग), पटियाला (डॉ. धरमवीर गांधी), मध्ये आघाडीवर आहे. आप तीन जागांवर आघाडीवर आहे, ज्यात संगरूर, आनंदपूर साहिब, होशियारपूरचा समावेश आहे.

माजी मित्रपक्ष अकाली दलाबरोबरची युती तुटल्यानंतर पंजाबमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणारा भाजपा १३ पैकी एकाही जागेवर आघाडीवर नाही. गुरदासपूर, लुधियाना, अमृतसर, पटियाला आणि जालंधरसह पाच जागांवर भाजपा क्रमांक २ वर आहे. भाजपाच्या उमेदवारांना संपूर्ण प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते, त्याचा परिणाम मतांवर झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress result in punjab loksabha election 2024 rac