कर्नाटक काँग्रेसने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बंगळुरूमध्ये एका खासगी स्वयंसेवी संस्थेला मतदारांची माहिती गोळा करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांच्या अटकेची मागणीही विरोक्षी पक्ष काँग्रेसने केली आहे. हा प्रकार नियमांचे उल्लंघन असून मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांच्याशी खाजगी संस्थेचे संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
साताऱ्यात दोन्ही राजांनी एकत्र येण्याची भाजपची सूचना; पालिका निवडणूक पक्षचिन्हावर लढविण्यास पक्ष ठाम
“एका खासगी संस्थेला माहिती गोळा करण्याची परवानगी कशी देण्यात आली? कंत्राटी कर्मचारी स्वत:ला सरकारी कर्मचारी सांगून गोपनीयतेच्या अधिकाराखाली संरक्षित असलेली लिंग, मतदार ओळखपत्र क्रमांक, आधार, वैवाहिक स्थिती इत्यादींविषयीची माहिती कशी काय गोळा करू शकतात?”, असा सवाल काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी विचारला आहे.
‘चिलूमे एज्युकेशनल कल्चरल’ आणि ‘रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ यांच्याकडून मतदारांची माहिती गोळा केली जात असल्याचं माध्यमांनी उघडकीस आणलं होतं. या संस्थांच्या स्वयंसेवकांकडून घरोघरी जाऊन मतदारांमध्ये जनजागृती केली जात होती. दरम्यान, या प्रकरणात वाद निर्माण झाल्यानंतर बंगळुरू महानगरपालिकेने परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे सांगत या संस्थांची परवानगी रद्द केली आहे. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून कालबद्ध चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातील राजकीय रणधुमाळी; खडसे कुटुंबियांना धक्क्यावर धक्के
मतदारांची माहिती गोळा करण्याची परवानगी देण्यात आलेल्या सर्व कंपन्या अश्वथनारायण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मल्लेश्वरम या मतदारसंघातील आहेत, असे सुरजेवाला यांनी सांगितले आहे. बोम्मई यांच्याकडे बंगळुरू अर्बन जिल्ह्याचा कार्यभार असल्याने या मतदारसंघात घडत असलेल्या बेकायदेशीर बाबींसाठी तेच जबाबदार आहेत, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
एक शक्ती आहे…जी पुढे ढकलते आहे….कन्याकुमारी पासून पायी चालत असलेल्या तरुणीच्या भावना
बोम्मई, अश्वथनारायण आणि या संस्थांचा काय संबंध आहे? असा सवालदेखील सुरजेवाला यांनी केला आहे. मतदार यादीत छेडछाड करणे आणि मतदारांना त्यांचा हक्क नाकारण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा कट आहे, असा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे.