अकोला : भाजपचा गड म्हणून ओळख असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रदेश पदाधिकारी, माजी आमदार, माजी महापौर आदींसह इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षात उमेदवारीसाठी चढाओढ लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यावेळेस देखील अकोला पश्चिमची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात एक जागा निवडून आणण्याचे आव्हान काँग्रेसपुढे राहील. बाळापूर वगळता जिल्ह्यातील उर्वरित चार मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकवत ठेवला. त्यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचा गड निर्माण केला. सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणणाऱ्या गोवर्धन शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली.

shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा >>>जरांगेंचा भाजपवरच राग का? शिंदे, अजित पवारांवर टीकेची तीव्रता कमी

विजयाची ‘डबल हॅट्ट्रिक’ साध्य करणाऱ्या दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना २०१९ मध्ये काँग्रेसने कडवी झुंज दिली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत गोवर्धन शर्मा यांचा दोन हजार ३६९ मतांनी निसटता विजय झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचे पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्यापेक्षा काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना १२ हजार ०७१ मते अधिक पडली. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये काँग्रेसचा उत्साह चांगलाच वाढला आहे. २०१९ व त्यानंतर रद्द झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांना उमेदवारी दिली होती. आता देखील ते इच्छूक आहेत. मात्र, गंभीर प्रकरणात पोलीस दप्तरी नाव असल्याने ही पार्श्वभूमी त्यांच्यासाठी कमकुवत बाजू ठरू शकते. इंटकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप वखारिया, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन, अविनाश देशमुख, विवेक पारसकर यांच्यासह १८ जण काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छूक आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठी आहे. उमेदवारी देतांना काँग्रेसकडून सारासार विचार केला जाणार आहे. त्यामध्ये जातीय समीकरण देखील महत्त्वपूर्ण ठरेल. अकोला पश्चिममध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसकडे अकोला पश्चिम मतदारसंघातून १८ इच्छूक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाकडून चाचपणी करून वरिष्ठ स्तरावरून उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल.- डॉ. प्रशांत वानखडे, महानगराध्यक्ष, काँग्रेस, अकोला.

Story img Loader