आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोदी, भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने विरोधकांची आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यासारखे नेते आघाडी करण्यास अनुकूल नसले तरी काँग्रेसकडून या सर्व प्रादेशिक पक्षांना एका अजेंड्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिक माहिती दिली आहे. मी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. विरोधकांना एकत्र आणण्याचा आम्ही शक्य तो प्रयत्न करू, असे खरगे म्हणाले आहेत.

विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न 

मी आतापर्यंत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी विरोधकांच्या ऐक्याबाबत चर्चा केली आहे, अशी माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. त्यांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. तसेच त्यांनी देशातील स्वायत्त संस्थांच्या होत असलेल्या अमर्याद गैरवापरावरही भाष्य केले. ते शुक्रवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आयोजित केलेल्या ‘आयडिया एक्स्जेंच’ या कार्यक्रमात बोलत होते.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात अशा चर्चा का सुरू झाल्या? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?

भाजपाच्या पराभवासाठी एकत्र यावे लागेल- खरगे

“सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. संसदेच्या बाहेरदेखील हा प्रयत्न सुरू आहे. इतर पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांशी मी चर्चा करत आहे. दोन ते तीन नेत्यांशी माझी चर्चादेखील झाली आहे. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, स्टॅलिन यांचादेखील समावेश आहे. भाजपाच्या पराभवासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल, असे मी त्यांना म्हणालो आहे,” अशी माहिती खरगे यांनी दिली.

मोदींचा पराभव हाच मुख्य अजेंडा- खरगे

“मी उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील याबाबत चर्चा केली आहे. माझे सचिव तुमची भेट घेतील. कृपया विरोधकांच्या ऐक्यावर तुम्ही चर्चा करावी, अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांकडे जाणार आहोत. मोदी यांच्या पराभवाचा आमचा मुख्य अजेंडा असेल. याआधीच सर्व पक्ष देशातील लोकशाही, संविधान तसेच देशातील स्वायत्त संस्थांच्या रक्षणासाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार का? ते पाहुया,” असेही खरगे म्हणाले.

 मतभेदांना दूर ठेवून समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न- खरगे

काँग्रेसकडून विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे आगामी काळात विरोधकांचे एक्य प्रत्यक्षात कसे होणार? असा प्रश्न खरगे यांना विचारण्यात आला. यावरही त्यांनी उत्तर दिले आहे. “सर्वांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही शक्य तो प्रयत्न करणार आहोत. आमच्यात काही मतभेद असतील. मात्र या मतभेदांना दूर ठेवून समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत येण्याची इच्छा नसणाऱ्या पक्षांचे मन वळवण्यात आम्ही यशस्वी होऊ. मात्र तरीदेखील एखाद्या पक्षाने आमच्याशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला, तर तो त्यांचा निर्णय असेल,” असे खरगे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्याशीही केली चर्चा- खरगे

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकात्मक भाष्य केल्यानंतर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. यावरही खरगे यांनी भाष्य केले. “आमचे काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद आहेत. मात्र एकत्र येताना या मतभेदांची अडचण येणार नाही. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रम ठरवूनच महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. ही आघाडी विकासाच्या मुद्द्यावरून होती. ही आघाडी पक्षाचे विचार लक्षात घेऊन करण्यात आली नव्हती,” असे स्पष्टीकरण खरगे यांनी दिले.

Story img Loader