संतोष प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणूक होत असलेल्या तेलंगणातील काँग्रेस आणि भाजपच्या निवडणूक व्यूहरचनेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. कारण दोन्ही पक्षांचे राज्य प्रभारी हे महाराष्ट्रातील आहेत. भाजपच्या विजयाबद्दल तेलंगणाचे प्रभारी प्रकाश जावडेकर हे आशावादी असतानाच, तेलंगणात यंदा काँग्रेसची सत्ता येणार, असा ठाम दावा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे करीत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तेलंगणात काँग्रेस पक्ष अजिबात स्पर्धेत नव्हता. पण कर्नाटकच्या विजयाने सारे चित्र बदलले आणि काँग्रेस आज लढतीत आहे. तेलंगणात सत्तेत येऊ, असा ठाम विश्वास ठाकरे यांनी ‘सत्ताकारण’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.
तेलंगणात काँग्रेस पक्ष सुरुवातीला एकदम कमकुवत दिसत होता. पण अचानक चित्र कसे काय बदलले ?
- तेलंगणात काँग्रेस पक्षात गटबाजी होती व पक्षाबद्दल सामान्य लोकांमध्ये विश्वासाची भावना नव्हती ही वस्तुस्थिती आहे. पण जानेवारीपासून आम्ही नेते व कार्यकर्त्यांना विश्वास दिला. पक्षाचा प्रभारी म्हणून सर्व नेत्यांना एकत्र आणले. पक्षाने १४०० किमीची यात्रा काढली होती. ४०च्या आसपास विधानसभा मतदारसंघातून यात्रा गेली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज्य काँग्रेस नेत्यांच्या यात्रेचेही उत्साहात स्वागत झाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या यशाने सारे चित्र बदलले. कर्नाटक प्रमाणेच तेलंगणा काँग्रेस जिंकू शकते हा लोकांमध्ये संदेश गेला. त्यातून परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती व भाजपचे नेते काँग्रेसमध्ये सामील झाले. राजकीय चित्र एकदम बदलत गेले. आधी भारत राष्ट्र समिती आणि भाजपमध्ये लढत होईल, असे चित्र होते. पण आता भाजपचे कोणी नावही घेत नाही. भारत राष्ट्र समितीचा प्रचाराचा सारा रोख हा काँग्रेसवर आहे. यातून चित्र स्पष्ट होते.
हेही वाचा… मध्य प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष बिघडवणार भाजपा-काँग्रेसच्या मतांचे गणित? काय सांगते जुनी आकडेवारी?
पक्षाला सत्ता मिळेल हा दावा कशाच्या आधारे करता ?
- भारत राष्ट्र समिती किंवा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसचा पर्याय लोकांना दिसू लागला आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात निवडणूकपूर्व काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची सत्तेत येताच पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्तता करण्यात आली. लोकांमध्ये यातून काँग्रेसबद्दल विश्वासाची भावना तयार झाली. नुसती आश्वासने देत तर त्याची पूर्तता केली जाते. शेजारील कर्नाटकमध्ये युवक, महिला, तरुण-तरुणी किंवा दुर्बल घटकांचा काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे किती फायदा झाला हे लोक बघत आहेत. यातूनच तेलंगणामधील लोकांमध्ये काँग्रेसबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली. याचा पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी, लोकांमध्ये काँग्रेसबद्दलची वाढलेली आपुलकी यातून काँग्रेसला सत्ता मिळेल हा दावा ठामपणे करतो.
हेही वाचा… हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा-काँग्रेसमध्ये चढाओढ
भारत राष्ट्र समितीची भक्कम पाळेमुळे, सरकारच्या विविध योजना यामुळे लोकांमध्ये केसीआर यांच्याबद्दल आजही आदराची भावना आहे. त्यावर काँग्रेस कशी मात करणार ?
- गेली दहा वर्षे केसीआर किंवा चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. शेतकरी, दलित, दुर्बल घटक, मुस्लीम या सर्वच समाज घटकांमध्ये सत्ताधारी भारत राष्ट्र समिती किंवा केसीआर यांच्याबद्दल नाराजी दिसते. केसीआर यांना गावागावांमध्ये जाऊन सभा घ्याव्या लागत आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये केसीआर प्रचाराला कधीच बाहेर पडले नव्हते. काँग्रेसने मतदारांना सहा आश्वासने दिली आहेत. त्यात महिलांना दरमहा २५०० रुपयांचे अनुदान, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर , राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास अशा आश्वानांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना दरमहा अनुदान देण्याची योजना आहे. काँग्रेसच्या या सहा आश्वासनांमुळे लोकांमध्ये काँग्रेसबद्दल आपुलकी व जिव्हाळा वाढला आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमुळे काँग्रेस ही आश्वासने पूर्ण करेल, अशी लोकांमध्ये विश्वासाची भावना तयार झाली. केसीआर नको किंवा त्यांना पराभूत करायचे ही लोकांची मानसिक तयारी झाली आहे.
हेही वाचा… मोफत देवदर्शन सहलीतून नगरमधील नेत्यांचे राजकीय ‘पुण्यसंचय’
सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळविण्यात काँग्रेसला यश येईल का ?
- पक्षाने जातनिहाय जनगणनेचे आश्वासन दिले आहे. यामुळे ओबीसी व अन्य मागास घटक खुश आहेत. तेलंगणात मुस्लीम समाज हा लक्षणिय आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि भाजपमध्ये नेहमीच पडद्याआडून हातमिळवणी झालेली असते. अनेक वर्षे चंद्रशेखर राव हे भाजपला संसदेत मदत करीत होते. यामुळेच मुस्लीम समाजात भारत राष्ट्क समिती किंवा केसीआर यांच्याबद्दल नाराजीची भावना दिसते. कर्नाटकात देवेगौडा यांचा पक्ष असतानाही मुस्लिमांनी काँग्रेसला एकगठ्ठा मते दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती तेलंगणात होईल. सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळवून काँग्रेस पक्ष सत्तेत येईल.