महेश सरलष्कर- भोपाळ (म.प्र)

प्रश्नः मध्य प्रदेशात काँग्रेसला २३० पैकी किती जागा मिळतील?

BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
colors of bjp flag used on trees and tents at various locations build for marathon
सत्ताबदलाचे पडसाद मॅरेथॉनवर; पिवळ्या रंगा ऐवजी भाजपच्या झेंड्याचे रंग
BJPs advertisement shows swearing in ceremony as BJPs not mahayutis
चर्चा तर होणारच! जाहिरातीच्या माध्यमातून भाजपचे मित्र पक्षावर दबावतंत्र…
devendra fadnavis bjp majority seats
विदर्भाची भाजपला साथ, काँग्रेसचीही राखली लाज
wardha district bjp mla
भाजपला तर यश मिळाले, आमचे काय ? महासंघाचा सवाल…

दिग्विजय सिंह – १३० जागा मिळतील. गेल्यावेळी मी १२६ जागा जिंकू असे सांगितले होते पण, ११४ मिळाल्या.

प्रश्नः गेल्या विधानसभा निवडणुकीत चंबळ-ग्वाल्हेर भागांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे फॅक्टर महत्त्वाचा होता. त्यांनी आमदार निवडून आणले होते. यावेळी ज्योतिरादित्य नसल्याचा काँग्रेसला फटका बसेल का?

हेही वाचा – ‘सपा’नंतर आता जदयू पक्षाचीही मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उडी; इंडिया आघाडीत काय चाललंय?

दिग्विजय सिंह – ज्योतिरादित्य शिंदेंनी आमदार निवडून आणलेले नव्हते. हे आमदार काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर निवडून आले होते. काही आमदार काँग्रेसला सोडून गेले. त्यातील काही पोटनिवडणुकीत पराभूत झाले. ग्वाल्हेर महापालिकेमध्ये तब्बल ५२ वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली. पारंपरिक भाजपकडे असणारी मुरैना महापालिका निवडणूकही काँग्रेसने जिंकली. आजघडीला मध्य प्रदेशात काँग्रेस मजबूत असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या काँग्रेस सोडून जाण्यामुळे काहीही फरक पडलेला नाही.

प्रश्नः २०१८ मध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले खरे पण, फूट पडली. आता काँग्रेसचे सरकार आले तर पाच वर्षे टिकू शकेल का?

दिग्विजय सिंह – काँग्रेसचे सरकार निश्चितपणे पाच वर्षे टिकू शकेल. काँग्रेसशी एकनिष्ठ राहणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही गडबड होणार नाही. काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही.

प्रश्नः काँग्रेसचे सरकार आले तर कमलनाथ मुख्यमंत्री बनू शकतील पण, नव्या पिढीतील कोण मुख्यमंत्री होऊ शकतो?

दिग्विजय सिंह – हाही आत्ता मुद्दा नाही. काँग्रेसची सत्ता आली तर जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे हेच आमचे लक्ष्य असेल.

प्रश्नः यावेळी निवडणुकीमध्ये तुम्ही फारसे न दिसण्यामागील कारण काय?

दिग्विजय सिंह – मी जेवढा राज्यभर दौरे करतो, तेवढा इतर कोणीही नेता करत नाही. मी मध्य प्रदेशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा दौरा केलेला आहे. अनेक नेते काम कमी आणि स्वतःचा प्रचार जास्त करतात. मी काम जास्त करतो पण, स्वतःचा प्रचार करत नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा. मग, तुम्हाला समजेल की, राज्यभर फिरणारा माझ्याव्यतिरिक्त दुसरा कोणाताही नेता नाही!

प्रश्नः काँग्रेसचा प्रचार मुख्यत्वे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याविरोधात केंद्रीत असून त्याचा खरोखरच लाभ मिळेल का?

दिग्विजय सिंह – इथे शिवराजसिंह सरकारने अनेक घोटाळे केले आहेत, त्यांच्याविरोधात काँग्रेस आरोपपत्र घेऊन लोकांसमोर जात आहे. घराघरात भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची माहिती पोहोचवली जात आहे. काँग्रेसने इथल्या जनतेला दिलेल्या आश्वासनांमधून काँग्रेसचा रोडमॅप आम्ही मांडलेला आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांभोवती काँग्रेसने प्रचार केंद्रीत केला आहे.

प्रश्नः प्रचाराचे इतर मुद्दे कोणते?

दिग्विजय सिंह – राजस्थानमध्ये २५ लाखांपर्यंतची आरोग्य योजना अशोक गेहलोत सरकारने लागू केली आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास त्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्येही सक्षम आरोग्य योजना तातडीने लागू केली जाईल. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी दिला जाईल. शेतकऱ्यांसाठीही दिलासा दिला असून प्रति क्विंटल २६०० रुपयांनी गहू खरेदी केला जाईल. थकित वीजबिल माफ केले जाईल. शेतकऱ्यांना ५०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. घरगुती वापरासाठी विजेच्या दरामध्येही कपात केली जाईल. वारसाहक्काने मिळालेल्या घरांचे नोंदणीकृत करारनामे अनेकांकडे नाहीत, त्यांना सरकारकडून नोंदणीकृत कागदपत्रे दिली जातील. त्या आधारावर लोकांना कर्जही घेता येतील.

प्रश्नः मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सौम्य हिंदुत्वाचा आधार का घेत आहे?

दिग्विजय सिंह – सौम्य हिंदुत्व अस्तित्वातच नाही. हिंदुत्वाचे धर्माशी काहीही देणेघेणे नाही. सावरकरांनी हिंदुत्वाचा शब्दप्रयोग केला होता. त्यांनी स्वतःच सांगितले होते की, हिंदुत्वाचा धर्माशी काही संबंध नाही. हिंदुत्व ही केवळ ओळख आहे. अनेकदा हिंदुत्वाचा चुकीचा अर्थ घेतला जातो.

प्रश्न- पण, इथे बजरंगबली वगैरे मुद्दे प्रचारामध्ये चर्चेत आहेत…

दिग्विजय सिंह – हा निवडणुकीचा मुद्दा नाही. इथे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि भाजपची घराणेशाही हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. २०१८ मध्ये आम्ही सत्तेवर आल्यावर लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचा प्रयत्न होत होता, पण, भाजपने आमचे सरकार पाडले, आता पुन्हा आमचे सरकार आले तर त्या आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल.

प्रश्नः सनातन धर्माशी निगडीत वादाचा निवडणुकीवर कोणता परिणाम होईल?

दिग्विजय सिंह – सनातन धर्मासंदर्भात कोणताही वाद-विवाद नाही. सनातन धर्माचा मूळ आधार कोणता हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. इथे जाती आधारित समाजरचना अस्तित्वात नव्हती. कर्माच्या आधारावर वर्णव्यवस्था निर्माण झाली. सनातन धर्मामध्ये अस्पृश्यता कधीच नव्हती. काँग्रेसने जातीवादाचा नेहमीच विरोध केलेला आहे. महात्मा गांधींएवढा सनातन धर्मी दुसरा कोण असेल सांगा! त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केलेला होता. सनातन धर्म चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडला जात असल्यामुळे वाद निर्माण होत आहे. सनातन धर्मामध्ये वाद वा भेदभाव नाही. सनातन धर्मामध्ये द्वेष नाही.

हेही वाचा – तेलंगणात अमित शाहांची मोठी घोषणा, निवडणूक जिंकल्यास मागासवर्गीय समाजातील नेत्याला मुख्यमंत्रिपद!

प्रश्नः इंडिया विरुद्ध भाजप या लढाईमध्ये मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक किती महत्त्वाची?

दिग्विजय सिंह – देशातील इतर राज्यांइतकाच मध्य प्रदेशही महत्त्वपूर्ण आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यामध्ये थेट लढाई असलेली राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात ही राज्ये काँग्रेससाठी अधिक महत्त्वाची ठरतात. मध्य प्रदेश तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नर्सरीच आहे. इथे जनसंघाच्या काळापासून काँग्रेसला मजबूत विरोधकांशी लढावे लागले आहे. त्यामुळे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीसाठीच नव्हे तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश काँग्रेससाठी कळीचे राज्य असेल.

प्रश्नः भाजपकडे मोदी हे स्टार प्रचारक आहेत, निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो?

दिग्विजय सिंह – मोदींमुळे अख्ख्या देशाचे नुकसान झाले आहे. मोदींमुळे फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचे भले झाले आहे. ७० बड्या उद्योजकांकडे देशाच्या अर्थसंकल्पाएवढी संपत्ती एकवटलेली आहे. त्यांची २५ लाख कोटींची बँक कर्जे मोदींनी माफ केली आहेत. महागाई वाढली, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. मोदींचा प्रभाव कर्नाटकमध्ये दिसला नाही. इतर राज्यांमध्येही नसेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही ते निष्प्रभ ठरतील.

Story img Loader